भारतात UFO दिसल्याने खळबळ; वायुसेनेच्या राफेलने पाठलाग केला आणि...

भारतात UFO दिसल्याने खळबळ उडाली आहे.  मणिपूरजवळ दिसलेल्या या UFO चा वायू सेनेच्या विमानांनी पाठलाग देखील केला. 

वनिता कांबळे | Updated: Nov 20, 2023, 03:32 PM IST
भारतात  UFO दिसल्याने खळबळ; वायुसेनेच्या राफेलने पाठलाग केला आणि...   title=

UFO In Manipur : जगभरात अनेक ठिकाणी  UFO दिसल्याचा दावा केला जातो. मात्र, भारतात  UFO  दिसल्याने खळबळ उडाली आहे.  इंफाळ विमानतळाजवळ UFO दिसले. यानंतर एकच गोंधळ उडाला.  इंफाळ विमानतळावरील विमान सेवा तात्काळ थांबवण्यात आली. वायुसेनेच्या राफेल विमानांनी या UFO चा पाठलाग देखील केला.

नेमकं काय घडलं?

मणिपूरमध्ये आधीच तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. अशातच रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास इंफाळ विमानतळाजवळील आकाशात UAV अर्थता Unmanned aerial vehicle दिसल्याने खळबळ उडाली. एअरपोर्ट कंट्रोल रुमने तात्काळ याबाबत सर्व यंत्रणांना मिाहिती देत त्यांना अलर्ट केले. खबरदारी म्हणून सुरक्षा यंत्रणेकडून इंफाळ विमानतळावर येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. 

अनेक विमाने खोळंबली

इंफाळमधील वीर टिकेंद्रजीत आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ UAV दिसले. इंफाळला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे तात्काळ रद्द करण्यात आली. काही उड्डाणे इम्फाळ एअरफील्डवरून परतली आणि इतर ठिकाणी वळवण्यात आली.  कोलकाताहून निघालेले एक विमान इंफाळ एअरपोर्टवर लँड करणार होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांकडून परवानगी मिळेपर्यंत या विमानाचे लँडिंग थांबवण्यात आले. प्रवाशांनी भरलेले हे विमान लँडिगसाठी तब्बल 25 मिनिटे खोळंबले होते. अखेरीस या विमानाला गुवाहाटी येथे वळवण्यात आले. सर्व 3  उड्डाणे सुमारे 3 तास उड्डाणे थांबवण्यात आली

वायुसेनेच्या राफेल विमानांनी केला पाठलाग

UAV हे ड्रोन असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशात दिसलेल्या संशयास्पद  UFO दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वायुसेनेच्या 2 राफेल विमानांना यांच्या शोधासाठी पाठवण्यात आले. वायूसेनेच्या कंट्रोल रुमला इंफाळ विमानतळावरून व्हिज्युअल इनपुट्स आले.  4 वाजण्याच्या सुमारास एक यूएफओ एअरफिल्डवरून पश्चिमेकडे जाताना दिसल्याचा संदेश हवाई दलाला देण्यात आला. हवाई दलाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली.   वायुसेनेच्या 2 राफेल विमानांनी अनेक वेळ या UFO चा शोध घेतला. मात्र, छोटी उडणारी वस्तू पुन्हा दिसली नाही. वायुसेनेच्या रडावर अशा प्रकारचे कोणतेही ऑब्जेक्ट दिसले नसल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आले. 

मणिपूरची सीमा तीन राज्य आणि एका देशाला जोडते

मणिपूरची सीमा तीन राज्य आणि एका देशाला जोडते. मणिपूरची पूर्व कमांड शिलाँगमध्ये आहे. मणिपूरची सीमा नागालँड, मिझोराम आणि आसाम या राज्याना जोडते.  तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आहे.