पत्नीने गाठली क्रौर्याची सीमा! शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला पतीचा मृतदेह; कॉल डिटेलमुळे भांडाफोड

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नौज (Kannauj) जिल्ह्यात एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केली. पोलिसांना शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने तरुणाची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, तपासाअंती धक्कादायक माहिती समोर आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 28, 2023, 12:15 PM IST
पत्नीने गाठली क्रौर्याची सीमा! शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला पतीचा मृतदेह; कॉल डिटेलमुळे भांडाफोड  title=

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नौज (Kannauj) जिल्ह्यात एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिर्वा कोतवाली क्षेत्रातील धर्ममंगद पूर गावातील रहिवासी असणारा मनोज पाल रात्री जेवल्यानंतर घराबाहेर पडला होता. पण तो घरी परत न आल्याने नातेवाईक रात्रभर त्याचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. शवविच्छेदन अहवालात धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. 

या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण परत न आल्याने कुटुंबाने शोध सुरु केला होता. यानंतर मंगळवारी नागरिकांना गावाबाहेर शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली होती. हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसंच तपास सुरु केला होता. 

काठी आणि लोखंडी करवत घेतली ताब्यात

पोलिसांना घटनास्थळावरुन हत्येसाठी वापरण्यात आलेली काठी आणि लोखंडी करवत जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसंच चेहऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. तसंच गळा दाबून त्याला ठार करण्यात आलं. 

पत्नीसह एका तरुणाला घेतलं ताब्यात

पोलिसांनी याप्रकरणी पीडित तरुणाची पत्नी संध्या आणि शेजारील गावात राहणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलीस दोघांचीही चौकशी करत आहे. चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. तसंच दोघांमध्ये प्रेमसंबंध होते हेदेखील समोर आलं आहे. 

प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

पोलिसांच्या हाती लागलेल्या प्राथमिक पुराव्यांनुसार प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मोबाइल रेकॉर्ड तपासले असता महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. जवळपास दीड वर्षांपासून पीडित तरुणाची पत्नी तरुणाशी संपर्कात होती हे उघड झालं आहे. 

पत्नीने दारु आणण्यासाठी दिले होते पैसे

पोलीस चौकशीत मनोजची पत्नी संध्याने सांगितलं की, सोमवारी रात्री उशिरा तिने पतीला दारुसाठी 150 रुपये दिले होते. मनोजने दारु विकत घेतल्यानंतर शेत गाठलं होतं. तिथे असलेल्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळला. 

पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मनोजच्या हत्येबाबत पोलिसांनी कुटुंबीय आणि गावकऱ्यांची चौकशी केली आहे. तिरवा कोतवालीच्या प्रभारी निरीक्षकांनी घटनेचा तपास सुरू असून लवकरच छडा लागेल असं म्हटलं आहे. 

मनोजच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांचीही चर्चा सुरु झाली आहे. कारण 30 वर्षांपूर्वी त्याचे वडील भाजी विकण्यासाठी कानपूरला गेले होते. पण ते कधी परत आलेच नाहीत. त्यांचा शोध लागलाच नव्हता.