थंडी, रात्र अन् जंगल...; दीराच्या प्रेमात वेडी झालेल्या महिलेने 3 मुलांसह केलं लाजिरवाणं कृत्य

पोलीस गस्त घालत असताना रात्री जंगलात एका विटभट्टीजवळ तीन मुलं थंडीच कु़डकुडत बसली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला.   

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2024, 12:43 PM IST
थंडी, रात्र अन् जंगल...; दीराच्या प्रेमात वेडी झालेल्या महिलेने 3 मुलांसह केलं लाजिरवाणं कृत्य title=

उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती पोलिसांना रात्री जंगलाजवळ 3 मुलं थंडीत कुडकुडत बसलेली दिसली. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वडिलांचं नाव आणि घराचा पत्ता सांगितला. पोलीस सर्वात आधी त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचले. यानंतर त्यांना गरम कपडे आणि खाण्यासाठी दिलं. यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या घऱी पोहोचवलं. पण यावेळी मुलांनी पोलिसांना आपल्या आईबद्दल सांगितलं. हे ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावले. 

झालं असं की, श्रावस्ती जिल्ह्याच्या भिनगा क्षेत्रातील गावात राहणारी महिला 6 महिन्यांपूर्वी आपल्या दीरासह फरार झाली होती. यावेळी तिने 3 मुलांनाही आपल्या सोबत नेलं होतं. प्रियकर आणि मुलांसह ती लखनऊत वास्तव्य करत होती. 14 जानेवारीला ती श्रावस्तीला आली. यावेळी तिने तिन्ही मुलांना जंगलाजवळ सोडून दिलं. यानंतर आपल्या प्रियकरासह फरार झाली. 

'आई आणि काका जंगलाच्या किनारी थंडीत सोडून गेले'

पोलीस रात्री गस्त घालत असताना त्यांची नजर थंडीत कुडकुडत बसलेल्या आपल्या तीन मुलांवर पडली. पोलिसांनी गाडी थांबवली आणि तिन्ही मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात गेले. यावेळी त्यांनी गरम कपडे, बिस्किटं आणि फळं दिली. चौकशी केली असता त्यांनी आई आणि काका लखनऊत राहत असल्याची माहिती दिली. रात्री जंगलाच्या किनारी आणलं आणि थंडीत सोडून गेले असंही त्यांनी सांगितलं. मुलांनी यावेळी आपल्या घऱाचा पत्ताही सांगितला. 

'मुलांना गरम कपडे आणि जेवणही दिलं'

पोलिसांनी मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडे सोपवलं आहे. तसंच महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाला पुरस्कार जाहीर केला आहे. 

पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे की, "भिनगा पोलीस गस्त घालत होते. यावेळी त्यांना विटभट्टीजवळ तीन मुलं बेवारस स्थितीत आढळली. यामध्ये दोन मुली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वडिलांचं नाव आणि घराचा पत्ता सांगितला. मुलांना सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे".