एकाच मंडपात दोन सख्ख्या बहिणींशी लग्न; कारण समजल्यावर शॉक व्हाल

राजस्थानमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. एका तरुणाने एकाच वेळी दोन बहिणींशी लग्न केले आहे. तिघेही सुखाने संसार करत आहेत. विशेष म्हणजे कुटुंबियांनी देखील या लग्नाला परवानगी दिली. 

वनिता कांबळे | Updated: May 12, 2023, 10:07 PM IST
एकाच मंडपात दोन सख्ख्या बहिणींशी लग्न; कारण समजल्यावर शॉक व्हाल title=

Unique Marriage : भारतात दोन विवाह करण्यास कायद्याने मान्यता नाही. पहिल्या पतीचे अथवा पत्नीचे निधन झाल्यास किंवा घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरा विवाह करता येत नाही. मात्र, राजस्थानमध्ये अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केले आहे. या तरुणाने गुपचूप नव्हे तर एकाच मंडपात एकाचवेळी या दोन बहिणींशी लग्न केले आहे. मात्र, तरुणाने एकाच वेळी दोन बहिणींशी लग्न का केले या मागचे कारण समजल्यावर सर्वांनी या नवदेवाचे कौतुक केले. 

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील उनियारा येथील मोरझाला गावात हा अनोखा विवाह सोहळा रंगला. हरीओम मीन असे दोन बहिंणीशी लग्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हरीओमचे वडिल रामप्रसाद यांनी आपल्या मुलाचे नाते सिंदडा येथील रहिवासी बाबूलाल मीणा यांची मोठी मुलगी कांतासह ठरवले. मात्र, लग्न ठरले तेव्हा कांताने हरीओमला एक अट घातली. ही अट मान्य केल्यामुळे हरीओमने कांता आणि तिची बहिण दोघींसह लग्न केले आहे. 5 मे रोजी हा विवाह सोहळा पार पडला. 

दोन बहिणींशी का केले लग्न?

हरीओम आणि कांता दोघेही उच्चशिक्षित आहेत. कुटुंबियांच्या संमतीने यांचा विवाह ठरला. लग्नाची तारीखही निश्चित झाली पण, लग्नाआधी कांताने हरीओमला एक अट घातली. माझ्यासह माझ्या लहान बहिणीशी देखील विवाह करायचा अशी ही अट होती. कांता हिची लहान बहिण गतीमंद होती. माझा विवाह झाला पण, माझ्या गतीमंद बहिणीशी कोण लग्न करणार याची काळजी कांताला वाटत होती.  यामुळे माझ्यासह माझ्या लहान बहिणीशी देखील विवाह करावा असे तिने हरीओमला संगितले. हरीओम देखील लग्नाला तयार झाला. 

दोन बायकांचा दादला

मध्य प्रदेशातून एक चक्रावून टाकणारी घडली होती. 2 बायकांचा दादला असलेल्या व्यक्तीचं हे प्रकरण आहे. नव-यानं पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातले ३ दिवस राहावं आणि दुस-या पत्नीसोबत 3 दिवस राहावं. रविवारी नव-याला वाटेल त्या पत्नीसोबत तो राहू शकतो, असा अजब आदेश मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरच्या फॅमिली कोर्टानं दिला आहे. 

तब्बल पंधरा बायकांचा नवरा

आफ्रिका खंडातील एक राजा सध्या बराच चर्चेत आला होता त्याच्या लग्नामुळे.  खरंतर स्वाझिलँड या छोट्याशा देशातील हा राजा नेहमीच चर्चेत असतो. ऐषोआरामी जीवन जगणारा आणि तब्बल पंधरा बायकांचा नवरा असलेला हा राजा चांगलाच चर्चेत आहे.