Bus Car Accident Video : भारतात रस्ते अपघाताचं (Road Accident) प्रमाण सर्वात जास्त आहे. गेल्या काही महिन्यात याच मोठी भर पडल्याचं पहायला मिळतंय. अशातच एक हादरवून टाकणारा व्हिडीओ (Accident Viral Video) समोर आलाय. कोलकाता (Kolkata) येथून एका भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे जिथे एका खाजगी बसने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एसयूव्हीला धडक दिली. हा व्हिडीओ (Bus Car Accident) पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, सॉल्ट लेक सेक्टर 5 मधील सर्वात वर्दळीचा प्रदेश असलेल्या कॉलेज जंक्शन येथे सोमवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी हा अपघात झाला. एका वेगवान बसने कारला धडक दिली अन् मोठा अपघात घडला. ही संपूर्ण घटना ट्रॅफिक जंक्शनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली असून ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, एका चौकात सिग्लन लागल्याने एक दुचाकी गाडी थांबली होती. त्याचवेळी एका बाजूने कार आपल्या वेगात जात होती, सिग्नल सुटल्याने गाडी सुसाट गाडी जात होती. मात्र, त्याचवेळी भरधाव बस येते अन् गाडीवर धडकते. त्यानंतर चौकात गोंधळ उडतो. परिसरातील लोकांनी धाव घेतली अन् बसमधील लोकांना आणि कार चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला.
3rd Oct, 2023. Kolkata Sector 5 bus accident pic.twitter.com/nbNQuAL0jC
— Saddam Hossain (@bestheart0027) October 4, 2023
दरम्यान, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले होते आणि त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. एअरबॅग्ज तैनात असल्याने कारमधील प्रवाशांनाही दुखापत झाली नाही. या अपघातात बसचा चालकासह अन्य 10 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये 30 प्रवासी होते. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बस हटविल्याने किमान 40 मिनिटे चौकाचौकावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.