Bad Bank च्या निर्णयामुळे बॅंकिंग शेअर्समध्ये तुफान तेजी; हे शेअर्स तुम्ही घेतले का?

 बँकांच्या शेअर्समध्ये आज शानदार तेजी दिसून आली आहे. बँक आणि फायनान्शिएल शेअर्सच्या जोरावर आज सेंसेक्स आणि निफ्टी रेकॉर्ड उच्चांकावर पोहचले आहेत.

Updated: Sep 17, 2021, 01:39 PM IST
Bad Bank च्या निर्णयामुळे बॅंकिंग शेअर्समध्ये तुफान तेजी; हे शेअर्स तुम्ही घेतले का? title=

मुंबई : बँकांच्या शेअर्समध्ये आज शानदार तेजी दिसून आली आहे. बँक आणि फायनान्शिएल शेअर्सच्या जोरावर आज सेंसेक्स आणि निफ्टी रेकॉर्ड उच्चांकावर पोहचले आहेत. सरकारने बॅड बँक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत ational Asset Reconstruction Company Ltd (NARCL)च्या वतीने जारी सेक्युरिटी रिसिट साठी 30600 कोटी रुपये देण्याची गॅरंटी देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे. ज्यानंतर आज बँकांच्या शेअर्समध्ये ऍक्शन दिसून आली आहे.

दोन्ही इंडेक्स रेकॉर्ड उच्चांकीवर
आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेंसेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्स रेकॉर्ड उच्चांकी वर पोहचले आहे. निफ्टीने 17778 चा आकडा गाठला होता. तर सेसेंक्सने 59663 चा रेकॉर्ड स्तर गाठला. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शिएल सर्विसेज इंडेक्समध्ये तेजी दिसून आली होती. फायनान्शिएल सर्विसेजचा निफ्टी 50मध्ये सर्वात जास्त वेटेज आहे.

बँकिंग सेक्टरला मिळणार  मजबूती
एक्सपर्टचे म्हणणे आहे की, बँकिंग सेक्टरला सरकारच्या निर्णयामुळे मजबूती मिळणार आहे. यापुढे गुंतवणूकदार आपला पैसा बँकिंग शेअर्समध्ये शिफ्ट करतील.  येत्या दिवसांमध्ये पब्लिक सेक्टर बँकांमध्ये SBI, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँकमध्ये तेजी दिसून येईल. कोरोनाच्या काळात आयटीने आऊटपरफॉर्म केले आहे. तर निफ्टी बँक त्यामानाने अंडरपरफॉर्म होते.  आता हा ट्रेंड बदलू शकतो. बॅंकिंग शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.