मुंबई : शेअर मार्केटमधले गैरव्यवहार आणि कर चोरी थांबवण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुंतवणूकदारांना आता आधार कार्ड नंबर देणं बंधनकारक असणार आहे.
३१ डिसेंबरपर्यंत आधार कार्डची माहिती ब्रोकर्सना गुंतवणूकदारांकडून घ्यावी लागणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांचा आधार कार्ड नंबर मिळाला नाही तर अशी अकाऊंट बंद करण्यात येणार आहेत.
आत्तापर्यंत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना पॅन कार्डनंबर बंधनकारक होता. पण एकाच गुंतवणूकदाराची अनेक पॅन कार्ड असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याआधारे बनावट डीमॅट अकाऊंट उघडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आता आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे.