श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमध्येच आफताब ठेवत होता जेवण; जबाब ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला

जवळपास महिनाभर त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवले होते. विशेष म्हणजे याच फ्रीजममध्ये तो आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू तसेच रोजचे जेवण देखील ठेवत होता. आफताब याचे हे कृत्य निघृणच नाही तर किळसवाणे देखील आहे.

Updated: Nov 15, 2022, 07:53 PM IST
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमध्येच आफताब ठेवत होता जेवण; जबाब ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला title=

Shraddha Murder Case, नवी दिल्ली :  दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाबाबात(Shraddha Murder Case) एकापाठोपाठ एक असे धक्कादायक आणि खळबळजनक अपडेट समोर येत आहे. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबने(Accused Aaftab) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे  35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज ते हे तुकडे एक एक करुन महरौली जंगलात(Mehrauli Forest) फेकत होता.  श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या  फ्रीजमध्ये ठेवले होते त्याच फ्रीजमध्ये आफताब जेवण ठेवत होता. तपासादरम्यान आफताबचा जबाब ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला(Criem News).

आफताब आणि श्रद्धा दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर या 28 वर्षीय तरुणीची तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने हत्या केली. आफताब याने श्रद्धाची हत्याच केली नाही तर क्रूरतेचा कळस गाठला.

दोन दिवस करत होता मृतदेहाचे तुकडे

आफताब याने श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. तब्बल दोन दिवस तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करत होता. शीरीराचे तुकडे पाडण्यासाठी  त्याने एक करवत देखील विकत आणली होती. काही काळ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले होते यामुळे मृतदेह कटींग करताना पदार्थ कटींगचा अनुभव कामी आल्याचे आफताब याने पोलिसांना सांगितले.

मृतदेहाचे तुकडे धुतले, सुकवले

मृतदेहातून दुर्गंधी येवू शकते याचा अंदाज आफताबला होता. यामुळे सर्वप्रथम त्याने आतड्यांचा खिमा केला. यानंतर आफताब याने श्रद्धाच्या मृतहेदाचे तुकडे स्वच्छ धुतले आणि सुकवले. यानंतर त्याने हे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत भरुन फ्रीजमध्ये ठेवले. 

याच फ्रिजमध्ये जेवण ठेवले

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज तो एक एक करुन हे तुकडे महरौली जंगलात फेकत होता. जवळपास महिनाभर त्याने मृतदेह तुकडे फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवले होते. विशेष म्हणजे याच फ्रीजममध्ये तो आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू तसेच रोजचे जेवण देखील ठेवत होता. आफताब याचे हे कृत्य निघृणच नाही तर किळसवाणे देखील आहे.

गूगल सर्च, बेवरीज पाहून लावली मृतदेहाची व्हिल्हेवाट

श्रद्धाशी भांडण झाल्यानंतर त्याने तिची हत्या केली. हत्येनंतर तो घाबरला. पण मृतदेह असाच कुठे टाकला तर पकडले जाऊ या भितीने त्याने गूगलवर सर्च करत तसेच बेवरीज पाहून मृतदेहाची व्हिल्हेवाट लावली. विशीष्ट प्रकारच्या केमीकलचा वापर करत त्याने जमीनीवर सांडलेले सर्व रक्त साफ केले. तसेच वास येऊ नये म्हणून तो सतत खोलीत रुम फ्रेशनर तसेच अत्तरचा वापर करत होता. तब्बल 18 दिवस तो मृतदेह जंगलात फेकत होता.     

श्रद्धाशी संपर्क होत नसल्याने पालघर येथे राहणाऱ्या तिच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिस तपासात श्रद्धाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट टाकत ती जिवंत असल्याचे भासवत होता.