Anand Mahindra Tweet: महिंद्रा अॅड महिंद्रा कंपनीचे (M&M) चेअरमन आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर (Anand Mahindra Twitter) अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतं. अनेकदा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आनंद महिंद्रा वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. आगळ्या वेगळ्या व्हिडीओचा त्यांच्याकडे साठा असतो, असं म्हटलं तर हरकत नसावी. अशातच आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याला कारण ठरलंय... आनंद महिंद्रा यांची भन्नाट हजरजबाबीपणा... (Anand Mahindra Tweet on norwegian ambassador erik solheims)
नुकतंच नॉर्वेचे राजदूत एरिक सोल्हेम (Erik Solheim) यांनी एक ट्विट केलं. त्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी खिल्ली उडवताना एक मजेदार गोष्ट लिहिली. ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. वास्तविक, एरिक सोल्हेमने त्याच्या ट्विटर हँडलवर डॉक्टरांचं एक प्रिस्क्रिप्शन शेअर केलंय. ज्यामध्ये रुग्णाचे नाव आनंद आहे.
एरिकने यांनी शेअर केलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये रुग्णाचे नाव आनंद असून त्यांना संगणक आणि मोबाईल फेकून देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एरिक सोल्हेमचे हे ट्विट खूप चर्चेत असताना उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विटची खिल्ली उडवली. या प्रिस्क्रिप्शन (Medical Prescription) ट्विटवर त्यांनी एक मजेशीर गोष्ट लिहिली आहे, जी यूजर्सना खूप आवडली आहे.
Looks like you were tweeting this to me, @ErikSolheim ??
By the way, my wife prescribed this for me aeons ago. And she doesn’t even possess a medical degree… https://t.co/UOu5lp54sE— anand mahindra (@anandmahindra) November 15, 2022
मला असं वाटतंय की तुम्ही मला उद्देशून हे ट्विट केलंय एरिक सोल्हेम?, असं महिंद्रा म्हणतात. माझ्या पत्नीने देखील काही दिवसांपूर्वी मोबाईल आणि कॅप्यूटर फेकून देण्याचा सल्ला दिला होता, असंही महिंद्रा म्हणाले. तसेच तिच्याकडे मेडिकल डिग्री देखील नाही, असं म्हणत खळखळून हसण्याचं सिम्बॉल देखील त्यांनी शेअर केलंय.