महाराष्ट्रासहीत 'या' राज्यांनीही वाढवला 'लॉकडाऊन'

ओडीसा, पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रात आता लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढणार 

Updated: Apr 11, 2020, 08:28 PM IST
महाराष्ट्रासहीत 'या' राज्यांनीही वाढवला 'लॉकडाऊन' title=

नवी दिल्ली : केंद्राच्या निर्णयानंतर चार राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घोषित केला. ओडीशा, पंजाब यांनी याआधी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. 

ओडीसा, पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रात आता लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनाचे वाढते संकट पाहता राज्यांमधील लॉकडाऊन वाढवत असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. संपूर्ण देशातील लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत कायम राहणार का ? हे पंतप्रधान मोदींच्या भाषणातून स्पष्ट होईल.

'कोरोनाचे प्रमाण शुन्यावर आणायचंय'

महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता राज्यातील लॉकडाऊन २ आठवडे म्हणजे ३० एप्रिलपर्यंत वाढवणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्या. मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या..यामध्ये १००० जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत.. ६० ते ७० टक्के कोरोना पॉझिटीव्हपैकींची लक्षणे ही सौम्य आहेत. 

मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. वयोमान, प्रकृती पाहता हा धोका पोहोचतो आहे. हृदयविकार, रक्तदाब असे आजार असलेल्या व्यक्ती तसेच शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण यात येते.

घराबाहेर पडू नका. घरातील वयस्कर नातेवाईकांना जपा. त्यांच्यापासून अंतर बाळगा. परिस्थिती नियंत्रणात असली तर गाफील राहून चालणार नाही. मला कोरोनाचे प्रमाण शुन्यावर आणायचे असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.