close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नोटबंदीच्या धक्क्यातून सावरतेय लग्नसराई क्षेत्र

नोटबंदीच्या तडाख्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली. अवघा देश बॅंकांच्या दारात रांग लाऊ ऊभा राहीला. त्याचे दिशातील अनेक उद्योग, व्यवसायांवर परिणाम झाला. लग्नसराई क्षेत्रही त्यापैकीच एक. पण, आता हे क्षेत्रही हळूहळू सावरू लागले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 22, 2017, 09:04 PM IST
नोटबंदीच्या धक्क्यातून सावरतेय लग्नसराई क्षेत्र

नवी दिल्ली : नोटबंदीच्या तडाख्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली. अवघा देश बॅंकांच्या दारात रांग लाऊ ऊभा राहीला. त्याचे दिशातील अनेक उद्योग, व्यवसायांवर परिणाम झाला. लग्नसराई क्षेत्रही त्यापैकीच एक. पण, आता हे क्षेत्रही हळूहळू सावरू लागले आहे.

विवाहक्षेत्राशी संबंधीत व्यवसाय, उद्योगांना नोटबंदीचा तडाखा

नोटबंदीचा निर्णय घेतला तेव्हा लग्नसराईचा हंगाम तोंडावर होता. त्यामुळे ज्वेलर्स, कपडमार्केट, डिजे, मंडप, केटरर्स यांसह विवाहाशी संबंधीत अनेक व्यवसायीक तयारी करून होते. मात्र, नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला आणि एकच कल्लोळ निर्माण झाला. अनेकांच्या आर्थिक खर्चात मोठी कपात झाली. सर्वसामान्यांच्या विवाहात आर्थिक चणचण जाणवू लागली. त्याचा परिणाम विवाहक्षेत्रात मंदीसदृष्य वातावरण तयार झाले. एकूणच काय तर, विवाहक्षेत्राशी संबंधीत व्यवसाय उद्योगांना मोठा फटका बसला. इतका की या क्षेत्राला 50 ते 80 टक्के तोटा सहन करावा लागला.

नोटबंदीनंतर आता कुठे सापडतोय सूर..

नोटबंदीच्या निर्णयाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या काळात आता हे क्षेत्र बऱ्यापैकी सावरते आहे. वेडींग पोर्टल बॅंडबाजाचे सहसंस्थापक आणि सीईओ सिंघल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयेत विवाह क्षेत्र आता बऱ्यापैकी सावरले आहे. त्यामुळे ज्वेलर्स, कपडमार्केट, डिजे, मंडप, केटरर्स आदींच्या खेरदी आणि मागणीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण क्षेत्र सावरते आहे. मार्केटमधील मूडही बदलत आहे. बॅंड, बाजा पुन्हा एकदा चांगल्या सूरात वाजण्याची चिन्हे आहेत.

भव्य-दिव्य विवाहांचे दिवस पुन्हा परतले

एशियातील ब्राईडल आणि लाईफ एग्जिबिशनमधील अघाडीची कंपनी ब्राईडल एशियाचे चीफ ऑप्रेटिंग ऑफिसर ध्रुव गुरूवारा यांनीही प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. बाजारपेठ चांगल्याप्रकारे सावरते आहे. देशातील भव्य-दिव्य विवाहांचे दिवस परत आले आहेत.