पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीचे भाव वाढणार

पेट्रोल-डिझेलनंतर आता सर्वसामान्यांना सीएनजी दरवाढीचा झटका बसणार आहे.

Updated: Sep 21, 2018, 04:51 PM IST
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीचे भाव वाढणार title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलनंतर आता सर्वसामान्यांना सीएनजी दरवाढीचा झटका बसणार आहे. १ ऑक्टोबरपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजी आणि पीएनजीचे दर प्रत्येक ६ महिन्यांनी बदलतात. यावेळी १४ टक्के दर वाढण्याचा अंदाज आहे.

मार्च २०१६ मध्ये वाढल्या होत्या किंमती

याआधी मार्च २०१६मध्ये सीएनजीच्या किंमती वाढल्या होत्या. प्राकृतिक गॅसच्या किंमती अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन आणि रशियाच्या बाजारानुसार ठरतात. जर रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर राहिला तर सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढतील. या किंमती वाढल्यामुळे बस, रिक्षा, चारचाकी आणि टेंपोच्या भाड्यात वाढ होईल. मुंबईमध्ये सध्या सीएनजी ४४.२२ रुपये प्रती किलो मिळत आहे. 

पुन्हा वाढले पेट्रोलचे दर

आज डिझेलचे दर स्थीर असले तरीही पेट्रोलच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय. आज मुंबईत पेट्रोल 89.69 रुपये लीटरने उपलब्ध आहे. म्हणजेच कालच्यापेक्षा आज पेट्रोल 9 पैशांनी महागलं आहे.