Illicit relationship: अनैतिक संबंधातून हत्येच्या घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. पण स्वत:च्या पतीचे अनैतिक संबंध रोखण्यासाठी पत्नीने नाट्यमयरित्या चक्क पतीच्या प्रेयसीचेच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासगंजमधील सोरोंजी पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला. येथे एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याचा शोध घेताना एकामागोमाग एक माहिती समोर येत गेली. एखाद्या क्राइम सिनेमाला लाजवेल असा घटनाक्रम यामध्ये घडत गेला. नेमकं काय झालं? याबद्दल जाणून घेऊया.
प्रीती उपाध्याय नावाच्या महिलेचा पती सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. या दाम्पत्याला 2 मुली आहेत. साधारण दीड वर्षांपूर्वी एक सीआरपीएफ पदावर काम करणारी महिला हेड कॉन्स्टेबलच्या संपर्कात आली. इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली होती. यातून त्यांच्या मैत्रीला प्रेमाचे अंकुर फुटू लागले होते. हेड कॉन्स्टेबलची पत्नी प्रीती उपाध्यायपासून ही गोष्ट लपून राहीली नव्हती.
प्रीतीचा पती आणि त्याची प्रेयची या दोघांमध्ये जवळीक वाढत चालली होती आणि दिवसेंदिवस मैत्री अधिकच घट्ट होत गेली. तसतसे प्रीतीचा संताप अनावर होत गेला. प्रीतीच्या पतीची प्रेयसी ही मूळची बोकारो (झारखंड) येथील रहिवासी होती. सध्या ती नोएडा येथील मुलींच्या वसतिगृहात वॉर्डन म्हणून काम करत होती. गेल्यावर्षी प्रितीची मोठी मुलगी आजारी पडली तेव्हा प्रेयसी असलेल्या महिलेने तिला खूप मदत केली. यावेळी प्रेयसी कॉन्स्टेबलची पत्नी प्रीती उपाध्याय हिच्याही संपर्कात आली. तसेच प्रेयसी ही सोरोंजी येथे आली असता त्यांच्या घरीदेखील राहिली होती.
पतीच्या अनैतिक संबंधामुळे घरात दुरावा निर्माण झाला होता. घरी भांडणे होऊ लागली होती. आता आरोपी प्रीती उपाध्यायच्या मनात त्या प्रेयसीला संपवण्याचा कट सुरु झाला. तिने प्रेयसीला फोन केला आणि आपली मुलगी पुन्हा आजारी असल्याचे सांगितले. 3 फेब्रुवारीला दोघांमध्ये बोलणं झालं. प्रेयसीला आपल्या आणि नवऱ्याच्या मार्गातून दूर करायचं प्रितीने ठरवलं. नोएडाहून प्रेयसी सोरोंजी येथे पोहोचली. दुसरीकडे प्रीतीने प्रेयसीला संपवण्यासाठी आपला भाऊ रिंकूची मदत घेतली.
आजारी मुलीला बघण्यासाठी प्रेयसी घरी आहे. पण घरात दबा धरुन बसलेल्या प्रिती आणि तिच्या भावाने प्रेयसीच्या डोक्यात वार केले आणि तिचं आयुष्य संपवून टाकले. त्यानंतर दोघा बहिण भावांनी मिळून मृतदेह गंगागड रस्त्यावर फेकून दिला.
या प्रकरणाचा शोध लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या सहकारी भावाला ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी करण्यात आली. अज्ञात महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी महिला आणि तरुण रिंकूला ताब्यात घेतले आहे. या दोघांची आता चौकशी केली जात आहे.
मृत महिलेची सर्वप्रथम हेड कॉन्स्टेबलसोबत इंस्टाग्रामवर मैत्री झाली. त्यामुळे सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबलची पत्नी नाराज होती. या वैमनस्यातूनच हत्याचा झाल्याची प्रतिक्रिया एसपी अपर्णा रजत कौशिक यांनी दिली.