हैदराबादेत भीषण विमान अपघातानंतर स्फोट; 2 वैमानिकांचा जागीच मृत्यू, अशा अवस्थेत सापडला ढिगारा

Air force Plane Crashes:  प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 वाजता पायलट ट्रेनर विमान क्रॅश झाल्याचे वृत्त समोर आले. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 4, 2023, 11:48 AM IST
हैदराबादेत भीषण विमान अपघातानंतर स्फोट; 2 वैमानिकांचा जागीच मृत्यू, अशा अवस्थेत सापडला ढिगारा title=

Air force Plane Crashes: सोमवारी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे विमान क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 वाजता पायलट ट्रेनर विमान क्रॅश झाल्याचे वृत्त समोर आले. यामध्ये 2 भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश असल्याची माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. हैदराबाद येथे नियमित प्रशिक्षणादरम्यान एका पायलट पीसी 7 Mk II विमानाला आज सकाळी अपघात झाला.  यात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झालाय. दिंडीगुलच्या एअर फोर्स अॅकडमीमध्ये हा प्रकार घडलाय. प्रशिक्षण सुरू असताना सकाळी 8 वाजून 55 मिनिटाला विमान कोसळलं.