नवी दिल्ली : नौदलाचे वाईस चीफ एसबी देव यांनी चुकून स्वत:वरच गोळी झाडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.त्यांना दिल्लीतील आर्मी रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पीटल (आरआर हॉस्पीटल) मध्ये दाखल करण्यात आलंय. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या गुडघ्यात प्लेट टाकण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Vice chief of the Indian Air Force, Air Marshal SB Deo has accidentally shot himself in the thigh. He is in RR Hospital, Delhi and is stable.
— ANI (@ANI) September 26, 2018
एसबी देव यांच्याकडून चुकून स्वत:वर गोळी झाडली गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तरीही दिल्ली पोलीस याप्रकणी प्राथमिक चौकशी करत आहेत. वाईस चीफ एसबी देव हे जून 1979 मध्ये फायटर पायलट होते तर जानेवारी 2017 मध्ये एअरफोर्सचे वाईस चीफ बनले. काही दिवसांपूर्वीच राफेल वर त्यांची प्रतिक्रिया आली होती. राफेल हे सुंदर एअरक्राफ्ट असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. इंडियन एअर फोर्स राफेलच्या प्रतिक्षेत आहे. यावर सुरु असलेल्या राजकारणावर त्यांनी काहीही बोलणं म्हटलं.