Airbag mandatory | तुम्हाला अपघातातून वाचवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; कारमध्ये हे तंत्रज्ञान बंधनकारक

1 एप्रिलपासून देशातील सर्व कारमध्ये पुढील दोन्ही आसनांसाठी एअरबॅग अनिवार्य असणार आहे

Updated: Mar 6, 2021, 09:49 AM IST
Airbag mandatory | तुम्हाला अपघातातून वाचवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; कारमध्ये हे तंत्रज्ञान बंधनकारक title=

नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून नवीन वाहनांना पुढील सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य असतील. रस्ता परिवहन व महामार्ग मंत्रालयाने यापूर्वी कायदा मंत्रालयाकडे एक प्रस्ताव पाठविला होता. ज्यात त्यांनी वाहन उत्पादकांना पुढील सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग बसविणे बंधनकारक करण्यात यावे असे नमूद केले होते. हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाने मान्य केला आहे. विद्यमान मॉडेल्ससाठी नवीन नियम 31 ऑगस्टपासून लागू केला जाईल. Safety in Car

1 एप्रिलपासून देशातील सर्व कारमध्ये पुढील दोन्ही आसनांसाठी एअरबॅग अनिवार्य असणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने संबधीत प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी 1 एप्रिलपासून पुढील आसनांसाठी एअरबॅग बंधनकारक केले आहे. 

31 ऑगस्ट पर्यंत एअरबॅग अनिवार्य (Airbag mandatory)

केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सध्या रस्त्यावर धावणाऱ्या कारमध्ये 31 ऑगस्टपर्यंत एअरबॅग लावणे बंधनकारक असणार आहे. 

टॉप मॉडेल कारमध्ये एअरबॅग (Airbags in Car)

कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या टॉप मॉडेलमध्ये एअरबॅग असतात. बहुतांश, कारमध्ये फक्त चालकाच्या आसनांसाठी एअरबॅग लावलेला असतो. आता त्यासोबत बसणाऱ्या पुढील सीटवरील व्यक्तीसाठीही एअरबॅग अनिवार्य  असणार आहे.

एअरबॅग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फायदा (airbag manufacturers)

केंद्र सरकारच्या निर्णयाचा एअरबॅग बनविणाऱ्या कंपन्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे. भारतात राणे मद्रास ही सर्वात मोठी एअरबॅग निर्माण करणाऱी कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय  कंपनी BOSCH सुद्धा मोठ्या प्रमाणात एअरबॅगची निर्मिती करते. सरकारच्या निर्णयाच्या या कंपन्यांना फायदा होणार आहे.

एअरबॅगची गरज काय?

कारमध्ये एअरबॅग असल्यास अपघातावेळी चालक आणि सोबत बसलेल्या  व्यक्तीचा  जीव  वाचू शकतो. कारने धडक दिल्यास एअरबॅग फुग्यांसारखे तत्काळ उघडतात. त्यामुळे पुढे बसलेल्या व्यक्ती स्टेअरिंग किंवा डॅशबोर्डवर धडकण्यापासून वाचतात. अपघातात बहुतांश जणांचा मृत्यू डोके स्टेअरिंग किंवा डॅशबोर्डवर धडकल्यामुळे होतो. एअरबॅगला सिलिकॉन कोटिंग असते. एअरबॅग सोडिएम एजाइड (sodium azide) 

एअरबॅग कसे  काम करते?

कारच्या बंपरला सेंसर लावण्यात येते. कार कोणत्याही गोष्टीला धडकल्यास तो सेंसर करंट एअरबॅग सिस्टिमपर्यंत पोहचतो. एअरबॅगमध्ये सोडिएम एजाइड गॅस भरलेला असतो. सेंसरचा करंट मिळताच. एका सेंकदापेक्षाही कमी वेळात एअरबॅग उघडतात.