सावधान! स्कुटीवरचा स्टंट अंगाशी... असा स्टंट करणं जीवावर बेतू शकतं, पाहा व्हिडीओ

'बाबाची परी' स्टंट करता करता कोसळली खाली...पाहा स्टंटचा थरारक व्हिडीओ

Updated: Dec 3, 2021, 08:30 PM IST
सावधान! स्कुटीवरचा स्टंट अंगाशी... असा स्टंट करणं जीवावर बेतू शकतं, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली: बऱ्याचदा स्कुटरवर जीवघेणे स्टंट केले जातात. आपला जीव धोक्यात घालून हे स्टंट केले जातात. यातून कमी अवधीमध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू असतो. मात्र या अशा स्टंटमुळे बऱ्याचदा ते जीवावरही बेतू शकतं. काहीवेळा या स्टंटमधून दुखापत होऊ शकते. असाच एक स्टंट फसला आणि अपघात घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक युजर्सना हसू आवरेनासं झालं आहे. घराबाहेर स्कुटी पोहोचताच स्टंट करण्याचा मोह आवरला नाही. पण या स्टंटच्या नादात स्कुटी घसरली आणि स्कुटीवरील दोघंही खाली कोसळले. 

घराच्या पार्किंगमध्ये स्टंट करताना दोन महिला खाली कोसळल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलांचा स्टंट फसला आणि दोघीही खाली कोसळल्या. या दोघींना सावरण्यासाठी एक तरुण येतो. तो देखील घसरून पडतो. 

black_lover__ox नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांनाही खूप आवडला आहे. या व्हिडीओला भरभरून लाईक आणि कमेंट्स येत आहेत.