स्थलांतरितांना राज्यात प्रवेश न देणाऱ्या ममता बॅनर्जींना अमित शहांनी खडसावले

केंद्र सरकार कोरोना उपाययोजनांच्या माध्यमातून राज्य सरकारवर कुरघोडी करु पाहत असल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप आहे.

Updated: May 9, 2020, 12:17 PM IST
स्थलांतरितांना राज्यात प्रवेश न देणाऱ्या ममता बॅनर्जींना अमित शहांनी खडसावले title=

नवी दिल्ली: केंद्र सरकारशी ३६ चा आकडा असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्तरावर एक तिढा निर्माणा झाला आहे. केंद्र सरकराकडून गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील मजुरांना रेल्वेने आपापल्या राज्यात पाठवले जात आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकार या ट्रेन्सना आपल्या राज्यात प्रवेश द्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून फैलावर घेतले आहे. परराज्यातील पश्चिम बंगालच्या नागरिकांना राज्यात प्रवेश नाकारून ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत.

धोका वाढला! देशातील कोरोना रुग्णांचा आकडा साठ हजारांच्या वाटेवर

 

हे मजूर आपल्या राज्यात परतण्यासाठी आतूर आहेत. केंद्र सरकारही त्यांना रेल्वेने पाठवायला तयार आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकारकडून केंद्राला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे अमित शहा यांनी पत्रात म्हटले आहे. 
पश्चिम बंगालचे सरकार मजुरांना घेऊन येणाऱ्या गाड्यांना राज्यात प्रवेशच देत नाही.  हा पश्चिम बंगालमधील स्थलांतरित मजुरांवर अन्याय आहे. यामुळे त्यांच्या हालअपेष्टांमध्ये भर पडेल, अशी भीती अमित शहा यांनी पत्रात व्यक्त केली आहे. 

'या' शहरांमध्ये आहेत देशातील ६० टक्के कोरोनाबाधित

यापूर्वी कोरोनाच्या उपाययोजना आणि लॉकडाऊनच्या नियमांवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. केंद्र सरकार कोरोना उपाययोजनांच्या माध्यमातून राज्य सरकारवर कुरघोडी करु पाहत असल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. या बैठकीलाही ममता बॅनर्जी गैरहजर राहिल्या होत्या. या सगळ्या पश्चिम बंगालमध्ये कठीण परिस्थिती उद्भावण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील कोरोनाचा मृत्यूदर कमालीचा जास्त आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे १,६७८ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, यापैकी १६० जणांचा मृत्यू झाला आहे.