'AMPHAN' चा मोठा कहर, पश्चिम बंगालमधील अनेक भागात मुसळधार पाऊस

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात जोरदार वादळासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Updated: May 20, 2020, 03:43 PM IST
 'AMPHAN' चा मोठा कहर, पश्चिम बंगालमधील अनेक भागात मुसळधार पाऊस  title=
संग्रहित छाया

मुंबई : भारताच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात जोरदार वादळासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागात दुपारपासून सुरु झालेला पाऊस सायंकाळपर्यंत जोरदार वादळासह सुरुच होता. यापूर्वीच बांकुरा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. आकाशात ढगांचा गडगडात होत आहे आणि सतत पाऊस पडत आहे. पश्चिम मिदनापूरला लागूनच असलेल्या सारेंगा ब्लॉक क्षेत्रातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

कोलकाता विमानतळाला वादळापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. वादळामुळे  मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन विमानतळाच्या तीन सी प्रवेशद्वार वगळता इतर सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आली आहेत.

महातूफान 'AMPHAN' का कहर शुरू, पश्चिम बंगाल के कई इलाकों में भारी बारिश

विमानतळाच्या कर्मचार्‍यांनी सर्व ट्रॉली रेलिंगच्या सहाय्याने बांधल्या आहेत. सर्व प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे क्विक रिस्पॉन्स टीम तयार ठेवण्यात आली आहे आणि त्याबरोबर सर्व ग्राउंड हँडलिंगच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत. जर वीज गायब झाली तर त्यासाठी पुरेसे डिझेल ठेवले गेले आहे. 

दरम्यान, टर्मिनलचे छप्पर देखील तपासले गेले आहे आणि सर्व  जॉइंट अधिक मजबूत करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त विमानतळावरील पार्किंगमध्ये विविध संस्थांची सर्व जेट विमानांची व्यवस्था करण्यात आली होती, त्या सर्वांना तेथून हटविण्यात आले आहे.

तुफानी वादळाचा परिणाम आसनसोलमध्येही दिसून आला. सकाळपासूनच आकाश ढगाळ असून अधूनमधून पाऊस पडत आहे. रस्त्यावर लोकांची वर्दळ कमी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमधील लोकांची संख्याही फारच कमी आहे आणि वादळ आणि पावसामुळे अगदी कमी लोकही दिसतात. आसनसोलच्या कुल्ती भागात पावसाने वादळासह तडाखा दिला.

उत्तर २४ परगण्यातील बशीरघाटात, सुंदरबन भागातील हिंगलगंजमधील लोकांना वादळाच्या आधी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. येथेही मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. ३०० लोकांना राणी बाला गर्ल्स हायस्कूलमध्ये नेण्यात आले आहे. सकाळपासूनच परिसरातील लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यासाठी प्रशासन काम करत आहे.