#JammuAndKashmir : लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

लष्कराची शोधमोहिम सुरु 

Updated: Mar 28, 2019, 08:23 AM IST
 #JammuAndKashmir : लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान  title=
छाया सौजन्य- एएनआय

श्रीनगर :   जम्मू काश्मीर येथील शोपियानमध्ये असणाऱ्या केल्लर येथे गुरुवारी सकाळी दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशदवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. संबंधित परिसरात अद्यापही लष्कराची शोधमोहिम सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. केल्लरच्या काही भागांमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  
 

दहशतवाद्याविषयीची माहिती मिळताच, भारतीय सैन्यदल, सीआरपीएफ आणि जम्मू- काश्मीर पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. सध्याच्या घडीला तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं असलं तरीही या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शोधमोहिम सुरु आहे.

शोपियांमध्ये ही कारवाई सुरु असते वेळीच जम्मू काश्मीर येथील आणखी एका भागात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. जम्मू- काश्मीर पोलिसांकडून याविषयीची माहिती देण्यात आली.