वृद्ध महिलेला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका

उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे.

Updated: Feb 10, 2018, 05:16 PM IST
वृद्ध महिलेला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका title=

बरेली : उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस वृद्ध महिलेला रस्त्यावरून खेचत घेऊन जात आहे. तसंच महिलेला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण करत आहे. महिलेला मारहाण होत असताना रस्त्यावरच्या नागरिकांनीही बघ्याची भूमिका घेतली. 
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर ही महिला आणि तिला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. शहरातल्या कोणत्या भागामध्ये हा प्रकार घडला आहे याचाही पोलीस तपास करत आहेत.

३५ सेंकंदांचा हा व्हिडिओ एएनआयनं प्रसिद्ध केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्रेण्ड होत आहे. तसंच या व्यक्तीच्या क्रुरतेवर आणि नागरिकांच्या बघ्याच्या भूमिकेवर चहू बाजूंनी टीका होत आहे. वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे.