Letrons BMW Transformer Car: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आणि उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचं वाहनांवरील प्रेम कधीही लपून राहिलं नाही.आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असतात. जगभरातील वेगवेगळ्या गोष्टींची व्हिडीओ (Viral Video) ते शेअर असतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे. अशातच आता आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
तुर्की ऑटोमोटिव्ह कंपनीने BMW 3 सिरीज सेडानवर आधारित ट्रान्सफॉर्मर कार ( Letrons BMW Transformer Car ) प्रोटोटाइप तयार केला आहे. हा त ट्रान्सफॉर्मर कार प्रोटोटाइप अगदी हॉलिवूड मुव्हीमध्ये दाखवल्यासारखा आहे. एका ठिकाणी थांबलेली कार ही जागेवर उभी राहते अगदी थाटात. जणू काही एखादा रोबोट उभा राहिला आहे. प्रोटोटाइप ही कार तुर्की कंपनी LETRONS द्वारे विकसित केली गेली आहे आणि कंपनीने तिच्या R&D केंद्रात प्रदर्शित केली होती. त्यावेळी अनेकांनी व्हिडीओ काढत सोशल मीडियावर व्हायरल केले.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुर्की संशोधन आणि विकास कंपनीने (Turkish Company Transformer Car Prototype) विकसित केलेला आणि प्रदर्शित केलेला वास्तविक जीवनातील 'ट्रान्सफॉर्मर' पहायला मिळतोय, आम्हाला आमच्या संशोधन आणि विकास केंद्रावर आनंद घ्यायचा आहे, असं म्हणत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि उत्पादन विकासाचे अध्यक्ष ए. वेलुस्वामी यांना हा व्हिडीओ टॅग केला आहे.
A real-life ‘transformer’ developed & showcased by a Turkish R&D company. We should be having such fun at our R&D too! @Velu_Mahindra ? pic.twitter.com/Ru1uK01RaA
— anand mahindra (@anandmahindra) August 7, 2023
दरम्यान, हा व्हिडीओ जुना असल्याची माहिती मिळाली आहे. 6 वर्षापूर्वी LETRONS ने ही कार तयार केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे म्हणजे ही गाडी रस्त्यावर पळवता देखील येते. तर पाहिजे तेव्हा ही गाडी उभी देखील केली जाऊ शकते. तर या गाडीचे मुव्हमेंट देखील केली जाऊ शकते. येत्या काळात हा कार रोबोट चालू शकेल, यावर देखील काम करण्याचा संकल्प करण्यात आला होता.