Anand mahindra : 'या पिंजऱ्यातून सुटका नाही'; पोपटाचा बोलका Video शेअर करत आनंद महिंद्रांनी सांगितली लाखमोलाची गोष्ट

Anand Mahindra Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पोपटाचा व्हिडीओ (Parrot Video) शेअर करत मानवाच्या सवयीविषयी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.

Updated: Oct 17, 2023, 11:00 AM IST
Anand mahindra : 'या पिंजऱ्यातून सुटका नाही'; पोपटाचा बोलका Video शेअर करत आनंद महिंद्रांनी सांगितली लाखमोलाची गोष्ट  title=
Anand mahindra Share Video of Parrots

Anand mahindra Share Video of Parrots : एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती सुटणं खूप अवघड असतं. दैनंदिन आयुष्यात देखील अशा गोष्टी आपण अनुभवत असतो. व्यसन असो वा प्रेम... सवय लागली की खेळ खल्लास झाला म्हणून समजा. सध्या मानवी गरजांपैकी एक असलेल्या इंटरनेटचं देखील सर्वांना व्यसन लागलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मोबाईलशिवाय माणूस राहू शकत नाही. दिवसातून किमान एकदा तरी मोबाईल हातात घेतल्याशिवाय चैन पडेल का? माणूस सोडा आता प्राण्यांना देखील मोबाईलचं वेड लागल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर प्राणी देखील मोबाईलच्या नादी लागल्याचे व्हिडीओ (Viral Video) समोर येत असतात. अशातच आता उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी एका पोपटाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ तुम्हाला देखील मोलाचा धडा देईल.

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतं. अतरंगी व्हिडीओ असो वा नव्या कलृपत्या... आनंद महिंद्रा नेहमी अनेकदा प्रोत्साहन देताना दिसतात. त्याचबरोबर त्यांचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील समोर येतो. त्यांच्या पोस्टमधून अनेक तरुणांनी प्रेऱणा घेतली आहे. अशातच आनंद महिंद्रांनी बोलक्या पोपटाचा व्हिडीओ शेअर करत मानवाच्या सवयीविषयी आपलं मत मांडलंय. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हि़डीओमध्ये एक पोपट आयपॅडमध्ये व्हिडीओ चाचपडताना दिसतोय. आपल्याच सारख्या पोपटांना पाहून पोपटाला देखील धक्का बसला. वास्तव आहे की कल्पना याचा त्याला पत्ता लागेना. पोपट देखील स्कोल करत आणखी पोपटांचे व्हिडीओ पाहू लागला. याचा व्हि़डीओ आनंद महिंद्रानी शेअर केलाय. 

काय म्हणतात Anand mahindra ?

पोपट टच स्क्रीन समजू शकतात. हा पोपट इतर पोपटांना पाहतोय. पोपट म्हणजे अनुकरण करणं. पण कृपया या पोपटाला सांगा की एकदा का तुम्ही माणसांच्या या सवयीचे अनुकरण करायला सुरुवात केली की, वेगळ्या प्रकारच्या ‘पिंजऱ्यातून’ सुटका नाही, असं म्हणत आनंद महिंद्रा यांनी लाखमोलाचा सल्ला दिला आहे.

पाहा Video

दरम्यान, आधीच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन प्राथमिक गरजा मानवाच्या होत्या. आता 21 व्या शतकात इंटरनेट हे नवं माध्यम मानसाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवत आहे.