बैलगाडीचा फोटो थेट एलन मस्क यांना टॅग; यापेक्षा ऑटोमॅटिक वाहन कोणतं असू शकतं?

Anand Mahindra Interesting Tweet : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर ऍक्टिव असणारे उद्योजक आहेत नुकतेच त्यांनी एक मजेशीर ट्वीट केले आहे. 

Updated: Apr 26, 2022, 10:06 AM IST
बैलगाडीचा फोटो थेट एलन मस्क यांना टॅग; यापेक्षा ऑटोमॅटिक वाहन कोणतं असू शकतं? title=

मुंबई : Anand Mahindra Interesting Tweet : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर ऍक्टिव असणारे उद्योजक आहेत नुकतेच त्यांनी एक मजेशीर ट्वीट केले आहे. नुकतेच आनंद महिंद्रा यांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना टॅग करत एक मजेशीर ट्वीट केले आहे. ज्यामध्ये दोन शेतकरी बैलगाडीवर झोपलेले दिसत आहेत.

बैलगाडीचा फोटो टाकताना आनंद महिंद्रा यांनी एक अतिशय मजेशीर गोष्टही लिहिली. महिंद्रा यांच्या ट्विटची सोशलमीडियावर चांगलीच चर्चा आहे.

आनंद महिंद्रा यांनी लिहिले BACK to the Future…

बॅक टू द फ्युचर या मजकूरासह, आनंद महिंद्रा यांनी लिहिले, "ऑरिजन टेस्ला वाहन, गुगल मॅपची गरज नाही, इंधनाची गरज नाही, प्रदूषण नाही आणि FSD मोड (पूर्णपणे सेल्फ ड्राइव्ह) नाही. घरापासून कामावर आणि कामापासून घरापर्यंत, आराम करा, झोपा आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचा."
जर तुम्ही कधी बैलगाडीवर बसला असाल तर तुम्हाला हे माहित असेलच की शेतकरी धान्य किंवा इतर वस्तू विकून घरी परतताना बैलगाडीच्या मागे झोपतात आणि बैल त्यांना त्यांच्या घरी घेऊन जातात.

ट्विटमध्ये एलोन मस्क यांना केलं टॅग

इलॉन मस्क यांच्या टेस्ला कार पूर्णतः स्वयंचलित म्हणून ओळखले जाते. याशिवाय टेस्ला कार पूर्णपणे इलेक्ट्रिक आहेत आणि त्या चालवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा एक थेंबही खर्च होत नाही. टेस्ला आता FSD नावाच्या पूर्णपणे सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावर काम करत आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये एलोन मस्क यांना टॅग करून याच गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.