'या' मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अनंत अंबानीनं एका झटक्यात दिलं 5,00,00,000 ₹ चं दान

Anant ambani : दानशूरपणा.... पाहून सारेच थक्क. बरं एकाच मंदिरात नव्हे, राम नवमीच्या निमित्तानं मंदिरांसाठी अनंतनं दान केली कोट्यवधींची रक्कम   

सायली पाटील | Updated: Apr 18, 2024, 01:00 PM IST
'या' मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अनंत अंबानीनं एका झटक्यात दिलं 5,00,00,000 ₹ चं दान title=
Anant Ambani Donates more than 5 crores To Jagannath Temple And Kamakhya Temple on Ram Navami

Anant ambani Wedding : रिलायन्स (Reliance Group) उद्योग समुहाचे सर्वेसर्वा, (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांच्या मुलांनी पाहता पाहता त्यांच्यावरील कामाचा भार स्वत:च्या खांद्यावर घेतला आणि अंबानी कुटुंबातील तिनही मुलांना समाजात वडिलांप्रमाणं मानाचं स्थान आहे. (Akash Ambani) आकाश असो, ईशा असो किंवा मग अनंत, अंबांनी कुटुंबातील या पुढच्या पिढीनंही कायमच सामाजिक भान जपण्याला प्राधान्य दिलं आहे. समाजात वावरत असताना आपण याच समाजाप्रतीही काही गोष्टी कराव्यात या भावनेनं झपाटून निघालेल्या अंबानी भावंडांपैकी एक अनंत अंबानीनं त्याच्या कृतीतून पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली. 

यंदाच्या वर्षी रामनवमीनिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आणि सोहळ्यांचं आयोदन करण्यात आलं होतं. याच दिवसाचं औचित्य साधत अनंतनं जवळपास दोन मंदिरांमध्ये 5 कोटी रुपयांची रक्कम दान केली. डीएनएच्या माहितीनुसार अनंतनं पुरी येथील जगन्नाथ मंदिरात 2.51 कोटी रुपये दान केले. 

राम नवमीच्या निमित्तानं अनंत मंगळवारी रात्री बराच उशिरा कडोकोट सुरक्षाव्यस्थेत या मंदिरात दर्शनासाठी आला होता. इथून तो आसामसाठी रवाना झाला, जिथं त्यानं कामाख्या देवीचंही दर्शन घेतलं. दरम्यान, अनंतनं दोन्ही मंदिरांमध्ये 2.51 कोटी रुपयांचं दान करत एकूण 5 कोटींची रक्कम देवाच्या चरणी सेवारुपात अर्पण केली. याबाबत त्यांनी कोणापुढंही कोणतीच वाच्यताही केलेली नाही. पण, सोशल मीडियावर मात्र काही सूत्रांच्या हवाल्यातून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आणि अनंतच्या या कृतीनं अनेकांचीच मनं जिंकली. 

देवदर्शनासाठी आलेल्या अनंतनं एका क्षणात इतकी मोठी रक्कम दान केली हे पाहून अनेकजण थक्कही झाले. दरम्यान, मंदिरांमध्ये दान करण्याची अनंतची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा त्यानं काही मंदिरांसाठी मोठी रक्कम दान केली आहे. 

हेसुद्धा वाचा : चांद्रयान मोहिमेसंदर्भात इस्रोचा नवा दावा; अद्यापही Mission chandrayaan सुरुच, कारण.... 

चारधान देवस्थान असो, केदारनाथ-बद्रीनाखथ मंदिरं असो, किंवा देशातील इतर काही श्रद्धास्थानं असो अनंत अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंबानं कायमच त्यांची कृतज्ञतापूर्ण भावना दान स्वरुपात व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. आधुनिक विचारांना वाव देणाऱ्या या कुटुंबानं कायमच सनातन धर्म, अध्यात्म या धारणांचा पायाही तितकाच भक्कम केला आहे. अशा या कुटुंबात सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant ambani Radhika merchant wedding date) यांच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरु असून, हा सोहळा आता नेमका कशी रंगत धरतो याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे.