Risky android apps removed by google play store : तुमच्या मोबाईलसाठी आणि तुमच्या तुमच्या पर्सनल डेटासाठी धोकादायक असे ऍप्स प्ले स्टोअरवरून (google play store) हटवण्यात आले आहेत. गुगल प्ले स्टोअर्सने हे ऍप्स हटवले आहेत. हेच ऍप्स काही थर्ड पार्टी स्टोअर्सवर (third party store) अजूनही उपलब्ध आहेत. अशा धोकादायक ऍप्सना तब्बल 20 लाखांपेक्षा अधिकांनी डाऊनलोड केलं आहे. जर तुमच्याही फोनमध्ये असे हानिकारक ऍप्स असतील, तर यांना आजच डिलीट करा. नाहीतर तुमच्या फोनमधील डेटा (Phone data) आणि तुमची खासगी माहिती हॅक( information hack ) होण्याची शक्यता आहे.
युजर्सचा डेटा चोरी करणारे संशयित धोकादायक ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरून सातत्याने काढून टाकण्यात येतात. IT सुरक्षेसंबंधित रिसर्च करणाऱ्या Bitdefender या कंपनीने याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. Bitdefender ने 35 मालवेअर्सची यादी जाहीर केली आहे.
एकदा तुम्ही हे ऍप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेत की तुम्हाला तात्काळ जाहिराती दाखवण्यास सुरुवात होते. महत्त्वाची बाब म्हणजे, हे इन्स्टॉल केलेले ऍप्स त्यांची नावं आणि आयकॉनही तुमच्या नकळत बदलतात.
अशा प्रकारचे ऍप्स डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही या ऍप्सना कोणत्या परमिशन देतात यावर लक्ष ठेवा. यासोबतच मुळात हे ऍप्स डाऊनलोड करताना युजर्स रेटिंगही चेक करा. सोबत तुमचा फोन सातत्याने अपडेट करा.
android users remove these malicious app from your mobile involved in data leak