ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा झटका बसला आहे. 

Updated: Aug 1, 2021, 02:34 PM IST
ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी ऑगस्टपासून गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 19 किलो कमर्शिअल गॅसच्या किंमती 73.5 रुपये प्रति सिलेंडरने वाढवले आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांध्ये 19 किलो सिलेंडरच्या किंमती 1600 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.

LPGचे भाव वाढले
घरघुती उपयोगाचे 14.2 किलोचे विना सब्सिडीचा गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. सब्सिडीच्या सिलेंडरची किंमत सध्या 834 रुपये आहे. जुलैमध्ये तेल कंपन्यांनी या सिलेंडरच्या किंमतीत 25.50 रुपयांनी वाढ केली होती.

कमर्शिअल गॅस सिलेंडरचीच्या राज्यातील किंमती

मुंबई 1601
नागपूर  1784
पुणे 1629
नाशिक 1653
औरंगाबाद 1650
अमरावती 1727
अहमदनगर  1650
सोलापूर 1662
जळगाव  1653
   

 तुम्हीदेखील गॅस सिलेंडरच्या किंमती चेक करू शकता. जर तुम्ही घरबसल्या गॅस सिलेंडरच्या किंमती चेक करू इच्छिता तर तेल कंपन्यांच्या संकेतस्थळाला भेट द्या. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) यामाध्यमातून तुम्ही आपल्या शहरातील गॅसच्या किंमती तपासू शकता.