Wedding Video : मंडपात नववधु घेत होती डुलकी; मुलाने असा घेतला गैरफायदा

विधीच्या वेळी भर मंडपात झोपणं नववधुला पडलं भारी, घडला हा प्रकार 

Updated: Aug 1, 2021, 01:40 PM IST
Wedding Video : मंडपात नववधु घेत होती डुलकी; मुलाने असा घेतला गैरफायदा

मुंबई : भारतीय पद्धतीच लग्न अनेक दिवस चालतं. त्यामुळे या लग्नात नववधु आणि नवरदेवाला खूप त्रास होतो. अनेक दिवस चालणाऱ्या या विधीत नवं जोडप्याची खूप गैरसोय होते. या दिवसांमध्ये यांना आराम देखील मिळत नाही. कधी कधी हे नवं दाम्पत्य इतके थकतात की, अगदी विधीच्या वेळी देखील हे झोपतात. 

हल्ली लग्नाचे अनेक व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विधीच्या वेळी चक्क नववधु झोपताना दिसत आहे. तिच्या झोपण्याचा एका मुलाने चक्क गैरफायदा घेताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Niranjan Mahapatra (@official_niranjanm87)

मंडपात वधूचा लागला डोळा

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वधू -वर लग्नाचे विधी पूर्ण करण्यासाठी मंडपाखाली बसले आहेत. मग वधूचा डोळा लागतो आणि झोपते. एक स्त्री हातवारे करून तिला उठवण्याचा प्रयत्न करते पण वधू खूप गाढ झोपेत होती. मग एक मुलगा त्याच्या झोपेचा चुकीचा फायदा घेताना दिसतो.

सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असलेली वधू आनंदाने झोपली होती. तिच्या मागे बसलेला मुलगा या संधीची वाट पाहत होता. त्याने अचानक मुलीचे चुंबन घेतले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मुलाला बेगानी लग्नात अब्दुल्ला वेडा असल्याचे वर्णन केले आहे. वधूच्या इतक्या जवळ बसून, याचा अंदाज लावला जाऊ शकतो की तो वधूचा भाऊ असेल.

हा व्हिडिओ निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत 19 हजारांहून अधिक लोकांनी हा मजेदार व्हिडिओ पाहिला आहे.