VIDEO: मुलायम सिंहांची सून अपर्णाचा ‘पद्मावती’च्या गाण्यावर ‘घूमर’ डान्स

देशभरात एकीकडे संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ला विरोध होत आहे. तर दुसरीकडे सिनेमाचे चाहतेही कमी नाहीयेत.

Updated: Nov 29, 2017, 02:18 PM IST
VIDEO: मुलायम सिंहांची सून अपर्णाचा ‘पद्मावती’च्या गाण्यावर ‘घूमर’ डान्स title=

नवी दिल्ली : देशभरात एकीकडे संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ला विरोध होत आहे. तर दुसरीकडे सिनेमाचे चाहतेही कमी नाहीयेत.

समाजवादी पक्षाचे संस्थापाक मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा बिष्ट यादवच्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. या व्हिडिओत अपर्णा यादव ‘पद्मावती’ सिनेमातेल ‘घूमर’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. झी मीडिया या व्हिडिओच्या सत्यतेची जबाबदारी घेत नाही.  

लग्नातील डान्स व्हिडिओ

असे बोलले जात आहे की, हा व्हिडिओ अपर्णाचा भाऊ अमन बिष्ट याच्या लग्नातील आहे. या व्हिडिओत अपर्णा राणी पद्मावतीच्या लूकमध्ये दिसत आहे. अपर्णा बिष्ट ही त्याच राजपूत समाजातील आहे, ज्या समाजाने या सिनेमा विरोधात आंदोलन छेडलं आहे. अपर्णा ही मुलायम सिंह यादव यांचा लहान मुलगा प्रतीकची पत्नी आहे. 

पद्मावती वादाच्या भोव-यात

दरम्यान, काही संघटना ‘पद्मावती’ सिनेमा विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. या सिनेमावर इतिहासासोबत छेडखानी करण्यात आल्याचा आरोप केलाय. ‘घूमर’ या गाण्यापासून हा वाद अधिक वाढला होता. करणी सेना आणि राजस्थानच्या राजघराण्यांचा आरोप आहे की, सिनेमातून इतिहास तोडून मोडून दाखवला आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. हा वाद इतका वाढला की, सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.