मनमोहन सिंग यांच्याबाबतच्या विधानावर अरुण जेटलींकडून निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये केलेल्या विधानावर, राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवेदन सादर केलं. 

Updated: Dec 27, 2017, 06:40 PM IST
मनमोहन सिंग यांच्याबाबतच्या विधानावर अरुण जेटलींकडून निवेदन  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये केलेल्या विधानावर, राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवेदन सादर केलं. 

‘मनमोहन सिंग यांच्याबद्दल आदरच’ 

मनमोहन सिंग यांच्याबद्दल आदरच असल्याचं अरुण जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यानंतर काँग्रेसचे खासदार गुलामनबी आझाद यांनी निवेदनाबाबत सरकारचे आभार मानले. सोबतच सभांमधून कोणताही नेता तसंच पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह विधान करणं टाळलं जाण्याचं आवहनही केलं.

‘कामकाज तहकूब’ 

गेल्या आठवड्यात याच मुद्द्यावरुन राज्यसभेत गदारोळ होऊन कामकाज तहकूब करावं लागलं होतं. त्यावर जेटलींनी हे निवेदन सादर केलं.