मराठा मोर्चा प्रमाणे मुस्लीम आरक्षणासाठी रस्त्यावर उतरु - ओवैसी

मराठा समाजाने संघटन शक्तीच्या बळावर आरक्षण मिळवले. त्याच पद्धतीने निवडणुकीनंतर आपणही रस्त्यावर उतरुन रस्ते बंद पाडून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याची घोषणा, एम आय एम खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी केली. औरंगाबादमधल्या सभेत ते बोलत होते. 

Updated: Oct 19, 2019, 08:51 AM IST
मराठा मोर्चा प्रमाणे मुस्लीम आरक्षणासाठी रस्त्यावर उतरु - ओवैसी

औरंगाबाद : मराठा समाजाने संघटन शक्तीच्या बळावर आरक्षण मिळवले. त्याच पद्धतीने निवडणुकीनंतर आपणही रस्त्यावर उतरुन रस्ते बंद पाडून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याची घोषणा, एम आय एम खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी केली. औरंगाबादमधल्या सभेत ते बोलत होते. 

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मुस्लीम आरक्षणाची मागणी केली आहे. मराठ्यांप्रमाणे मुस्लिमांना ही आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच भिवंडीत झालेल्या सभेत ओवैसींनी म्हटलं होतं की, 'जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही तिहेरी तलाक बिल आणून मुस्लीम महिलांना न्याय दिला. जर तुम्हाला खरच न्याय द्यायचा आहे तर मराठी समाजा प्रमाणे मुस्लिमांना ही आरक्षण द्या.'

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी पुन्हा एकदा जातीचं कार्ड वापरलं आहे. भिवंडीनंतर औरंगाबादमधील सभेतही त्यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी केली. पण या सभेत त्यांनी निवडणुकीनंतर रस्त्यावर उतरणार असल्याची देखील घोषणा केली.