असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून 'भगवा फेटा' परिधान

असदुद्दीन यांचं यावेळेस भाषण नाही, तर त्यांचा भगवा फेट्याचे व्हिडीओ आणि फोटो जास्त व्हायरल होत आहेत. 

Updated: May 8, 2018, 08:16 PM IST
असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून 'भगवा फेटा' परिधान title=

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आज 'मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमीन' म्हणजेच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं, तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाहीत, असदुद्दीन ओवेसी यांनी भगवा फेटा घातला होता. त्यांच्या डोक्यावर नेहमी गोल टोपी असते, पण यावेळेस त्यांना भगवा फेटा ज्याला दक्षिणेत साफा म्हणतात. असदुद्दीन यांचं यावेळेस भाषण नाही, तर त्यांचा भगवा फेट्याचे व्हिडीओ आणि फोटो जास्त व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे ओवेसी यांचा पक्ष कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवत नाहीय. निवडणुकीच्या सुरूवातीलाच त्यांनी घोषणा केली होती, की त्यांचा पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार नाही, पण जद-एस म्हणजेच जनता दल सेक्युलरला त्यांचा पाठिंबा असेल.

ओवेसी यांनी सांगितलं की, कर्नाटकमध्ये आम्हाला गुणात्मक विकास हवा आहे, यासाठी काँग्रेस किंवा भाजपाशिवाय आम्हाला कर्नाटकात सरकार हवं आहे. आता जेडीएस असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा अशा भागांमध्ये आयोजित करत आहे, जेथे जो भाग मुस्लिम बहुल आहे, बेळगावात देखील अशाच भागात ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होत आहे. मतमोजणी १५ मे रोजी पार पडणार आहे, कर्नाटक विधानसभेत सध्या भाजपकडे ४३ जागा आहेत, तर काँग्रेसकडे १२२ जागा आहेत.