नवी दिल्ली : ईशान्य भारतातील आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये रक्तरंजित हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आसाम पोलिसांचे 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये cachar जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह 50 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
तुम्ही आतापर्यंत पोलीसांना गुन्हेगारांशी किंवा दहशतवादी, नक्षलवाद्यांशी लढताना पाहिलं असेल. परंतु आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे. दोन्ही राज्य एकमेकांच्या पोलिसांना याबाबत जबाबदार ठरवत आहेत. राज्यांनी केंद्र सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा असे म्हटले आहे.
ट्विटरवर आरोप प्रत्यारोप
सुरूवातीला मिझोरमचे मुख्यमंत्री जोर मथंगा यांनी झालेल्या हिंसेवर ट्वीट केले. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देखील मिझोरमच्या पोलिस आसामच्या पोलिसांना त्यांच्या जमिनीवरून हटवू इच्छितात.
मिझोरमच्या कोलासिब जिल्ह्याच्या एसपी यांनी म्हटले की, मिझोरमची पोलिस मागे जाणार नाही. तसेच नागरीकही जाणार नाहीत. त्यानंतर दोन्ही पोलिसांमध्ये झालेल्या हिंसेत नागरीकही सहभागी झाले.
वाद काय
आसाम आणि मिझोरमची सामाईक सीमा 164 किलोमीटर आहे, मिझोरमचे एजवाल, कोलासिब, मामित आणि आसामच्या cachar, हेल कांडी आणि करीमगंज जिल्ह्यांची सामाईक सीमा आहे. सीमावर्ती भागातील गुटगुटी गावापासून हा वाद सुरू झाला. या गावात मिझोरमच्या पोलिसांनी काही तात्पुरते कॅप लावले होते.
आसाम पोलिसांचे म्हणणे आहे की, हे कॅप आसामच्या जमिनीवर आहेत. मिझोरमच्या पोलिसांचे म्हणणे आहे की, हा मिझोरमचा भाग आहे. यावरून झालेल्या वादादरम्यान दोन्ही पोलिसांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसेच cachar चे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह 50 पोलिस कर्मचारी जखमी आहेत.
आसाम आणि मिझोरम दरम्यान, सुरू असलेला हा सीमा विवाद 146 वर्ष जुना आहे. 1875 साली इंग्रजांनी मिझोरम आणि आसाममध्ये cachar जिल्ह्यात सीमा निर्धारित केली होती. तेव्हा मिझोरम लुशाई हिल्स म्हटले जात होते.
या हिंसेत जखमी झालेले वैभव निंबाळकर मुळचे बारामतीचे असून त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. पुण्यातूनच त्यांनी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करून संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.