Bihar Election Results: एनडीएला स्पष्ट बहुमत तर आरजेडी मोठा पक्ष

बिहार विधानसभा निवडणुकीच्य़ा (Bihar Assembly Election Results) मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले होते. तेजस्वी यादव यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ७५ जांगावर विजय मिळवला आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Nov 11, 2020, 07:07 AM IST
Bihar Election Results: एनडीएला स्पष्ट बहुमत तर आरजेडी मोठा पक्ष title=

- भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने (NDA) स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election Results) मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती आले आहेत. १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपने, ४३ जागा जेडीयू आणि मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महागठबंधनने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी आरजेडीने  केली आहे. तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

महागठबंधनमधील काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एनडीेएची सत्ता आली असून नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झालेय.

- बिहारमध्ये (Bihar Election Results) उशिरा रात्रीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे.

- बिहारमध्ये ४२ जागांवर ५०० आणि ७४ जागांवर १००० मतांचे अंतर असून तशी आघाडी दिसत आहे. त्यामुळे निकालचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, एनडीएनने आघाडी घेतली असून १२६ जांगावर तर महागठबंधन १०७ जागांवर आघाडीवर आहे. तर डाव्यांना १९ ठिकाणी आघाडी मिळाली आहे.

- मायवती यांच्या बसपला दोन ठिकाणी आघाडी मिळाली आहे.

- बिहारमध्ये पहिला निकाल जाहीर । सहा तासानंतर निकाल जाहीर । केवटीमध्ये भाजप उमेदवार विजयी तर दुसरा निकाल आरजेडीच्या पारड्यात । दरभंगामध्ये आरजेडीचा उमेदवार विजयी

- सध्या बिहारमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार २१ टक्के मतमोजणी झाली. यात जवळपास ६५ जागा या ५०० मतांच्या फरकाने मागे-पुढे आहेत. त्यामुळे या ठिकाणी चित्र बदलू शकते. तर काही ठिकाणी ५००० पेक्षा कमी मतांच्या फरकारने ९९ जागा आहेत. त्यामुळे अखेरच्या क्षणी चित्र पलटू शकते,अशी शक्यता आहे.

सध्याची परिस्थिती

- बिहारमध्ये (Bihar Election) सत्ताधारी एनडीएचं जोरदार कमबॅक, सव्वाशे पेक्षा अधिक जागांवर आघाडी तर काँग्रेसची पीछेहाट तेजस्वी यादवांना भोवण्याची शक्यता, डाव्यांचीही मुसंडी

- भाजपच्या जोरदार मुसंडीनंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण तर नितीश कुमारांच्या जेडीयू कार्यकर्त्यांच्याही जल्लोष

- मध्य प्रदेशात भाजपचं सरकार तरणार, तर देशभरातल्या इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपची विजयी घोडदौड, तर बिहारमधल्या एकमेव लोकसभा पोटनिवडणुकीत जेडीयू आघाडीवर

- निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राष्ट्रीय जनता दलाचे नेते (Rashtriya Janata Dal leader) तेजस्वी यादव (Tejashwi Yadav)राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत

महागठबंधन-एनडीए, कोण मारणार बाजी, पाहा आघाडी?

- निकाल लागण्यास सुरुवात झाल्यानंतर आरजेडी आघाडीवर होता. मात्र, ही आघाडी काय टिकवता आलेली नाही. तर पिछाडीवरुन भाजप अर्थात एनडीए पुढे गेला आहे. निवडणूक आयोगानुसार २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर तर भाजप ४२, जदयू ३४ विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महागठबंधन ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात आरजेडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ आणि डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर असून लोजपा दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.

- बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने आघाडी घेतली होती. मात्र, सध्या भाजप प्रणीत एनडीए आणि महाविकास आघाडीमधील अंतर बरचसे कमी झाले आहे. एनडीए आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत दिसत आहे.

आरजेडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे...मासे भेट देणं हे शुभ संकेत मानले जातात. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आरजेडी आघाडीवर आहे म्हणूनच राबडी देवींच्या घराबाहेर आरजेडीचे कार्यकर्ते मासे घेऊन दाखल झाले आहेत.

...म्हणून तेजस्वी, तेज प्रताप यादवांसाठी कार्यकर्त्यांनी आणले शुभशकूनी मासे

- मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक: २८ पैकी १४ जागांवर भाजप आघाडीवर आहे, काँग्रेस ५ जागांवर तर बहुजन समाज पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे.

MP Election Result : ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत राहणार की जाणार?

- आरजेडी महागठबंधनच्या जागांत घट तर एनडीएच्या जागांत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीत जोरदार चुरस दिसत आहे. आरजेडी ११३ जागांवर तर एनडीए ११९ जागांवर आघाडीवर आहे.

- बिहारमधील तरुण ३१ वर्षीय नेत्याने केंद्रातील सत्तेला आव्हान दिले आहे. तेजस्वी नेतृत्व उदयाला येत आहे. मंगलराज बिहारमध्ये दिसून येईल - शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत

- पहिल्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने घेतली आघाडी. कल हाती येताच आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव (Tejashwi Yadav ) यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. 

- आरजेडी महागठबंधन १०० तर एनडीए ७५ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव आणि त्यांचा भाऊ तेज प्रताप यांनी आघाडी घेतली आहे.

- आरजेडी ७५ तर एनडीए ४८ जागांवर आघाडीवर

- तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने सध्या आघाडी घेतल्याची दिसून येत आहे. नीतीश कुमार यांच्या जेडीयूला भाजपपेक्षा कमी जागा दिसून येत आहे. तर काँग्रेसनेही आघाडी घेतलेली दिसून येत आहे. आरजेडी ३२ तर काँग्रेस ४ आणि भाजप २० ते जेडीयू ८ जागांवर आघाडीवर

- भाजप - ६, काँग्रेस - १, जेडीयू - २, आरजेडी ७ ठिकाणी आघाडीवर

- जेडीयू आणि भाजप यांना दोन ठिकाणी आघाडी

- लोकजनशक्ती पार्टीला यश मिळावं यासाठी कार्यकर्त्यांकडून होमहवन करण्यात आले. 

- बिहार विधानसभा निवडणुक निकालांच्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यर्त्यांनी हवन सुरु केले आहे 

- पोस्टल मतदान मोजणीत पहिला कल भाजपच्या बाजुने आला आहे.

 Assembly Election Results Live : बिहारमध्ये एनडीए आणि आरजेडीत अटीतटीची लढत

- बहुतेक एक्झिट पोलमध्ये आरजेडीला सर्वाधिक मतं मिळणार असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींच्या घराबाहेर गर्दी दिसून येत आहे.

निकाल हाती यायला वेळ लागणार

कोरोनामुळे बिहार विधानसभेचे निकाल हाती यायला वेळ लागणार आहे. बिहारमधल्या २४३ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होत आहे.

- मध्य प्रदेश पोटनिवडणुकीकडे लक्ष

बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच देशाच्या ११ राज्यांमधील ५८ विधानसभा जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचा निकालही आज लागणार आहे. मध्यप्रदेशातल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर तिथल्या भाजप सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातल्या सर्वाधिक २८  जागांसाठी आज मतमोजणी होतेय. इथली सत्ता राखण्यासाठी भाजपला किमान ८ जागा जिंकणे गरजेचे आहे. 

- गुजरात, उत्तर प्रदेशकडेही नजरा

गुजरातमधल्या ८ आणि उत्तर प्रदेशातल्या ७ जागांच्या पोटनिवडणूक निकालालाही महत्त्व आहे. त्याशिवाय कर्नाटक, ओडिशा, झारखंड नागालँड, तेलंगणा, छत्तीसगढ आणि हरियाणामध्येही पोटनिवडणुका झाल्या. त्याठिकाणीही आज मतमोजणी होणार आहे.

 Assembly Election Results Live : बिहारमध्ये नितीश कुमार की तेजस्वी यादव याचीच चर्चा

- थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

कोण मारणार बाजी?

बिहार चुनाव: किसके सिर पर सजेगा बिहार का ताज? इस सीट पर आएंगे सबसे पहले नतीजे

पाटणा : बिहार विधानसभा (Bihar Assembly) निवडणुकीच्य़ा मतमोजणीकडे (Bihar Assembly Election Results) साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अवघ्या तिशीतले तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाचे प्रचंड अनुभवी मुख्यमंत्री नितीश कुमार( Nitish Kumar) यांच्यातील लढतीचा फैसला आज होत आहे. दरम्यान, एक्झिट पोलने तेजस्वी यादव यांना पसंती दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताबदल होणार का, याचीच उत्सुकता आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी ३ टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ८ वाजता सुरू होईल. बिहारच्या ३८ जिल्ह्यांमधील ५५ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. प्रामुख्यानं नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादवांच्या नेतृत्वात पाच पक्षांच्या महागठबंधन यांच्यात लढत असली तरी स्वबळावर लढणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीकडेही लक्ष असेल. 

बहुतांश एक्झिट पोल्सनी सत्तांतराचा अंदाज वर्तवला असताना मतमोजणी केंद्रांवर तणाव वाढण्याची भीती निवडणूक आयोगाला वाटतेय. त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणी केंद्रीय पोलिसांची पथकं तैनात करण्यात आलीयेत. तेजस्वी यादव वैशाली जिल्ह्यातल्या राघोपूरमधून तर त्यांचे थोरले बंधू तेजप्रताप समस्तीपूर जिल्ह्यातल्या हसनपूरमधून निवडणूक लढवतायत. विधान परिषदेत असलेले नितीश कुमार स्वतः लढत नसले, तरी त्यांच्या अर्धा डझन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.