म्हशीने तोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड

जगभरात सरस्वती नंबर 1 

Updated: Dec 14, 2019, 07:36 AM IST
म्हशीने तोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड title=

मुंबई : पशुपालन हे फक्त व्यवसायापूर्ती मर्यादित न राहता त्यातून एक लोकप्रियता मिळवण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. पशुपालनात आपल्या प्राण्यांना वेगवेगळ्या स्पर्धेत देखील सहभागी करून घेतलं जातं आहे. हिरयाणाच्या हिसारमधील लितानी गावातील सरस्वतीने पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. 

पशुपालन करणं हे एक जिकरीचं काम आहे. पण काही पशुपालक आपल्या पशूंवर खूप मेहनत घेतात. या मेहनतीच्या जोरावर ते आपल्या देशाचं नाव जगभरात करतात. अशीच मेहनत हरियाणाच्या सुखबीर ढांडा यांनी घेतली आहे. त्यांच्या या मेहनतीचं चिझ म्हैस सरस्वतीने करून दाखवलं आहे. 

सुखवीर यांनी आपली म्हैस सरस्वतीवर मेहनत घेतली आणि या सरस्वतीने पाकिस्तानच्या म्हशीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. यामुळे फक्त हरियाणाचाच नाही तर भारताचं ही नाव जगभरात केलं आहे. 
जिसके घर में काली उसकी रोज दिवाली....या पंक्ती हरियाणातील काळ सोनं म्हणून ओळखल्या जातात. 

मीडियाला दिलेल्या माहितीत ते म्हणाले की,'2007 मध्ये त्यांनी पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला. 2009 पासून दुध देण्याच्या स्पर्धेत सुखबीर ढांडा सहभागी होऊ लागले. हरयाणाचे सुखबीर आपल्या सरस्वती म्हशीला घेऊन लुधियानाच्या जगरावमध्ये झालेल्या डेअरी अॅण्ड एग्री एक्सपोमध्ये सहभागी झाले. तेथे पीडीएफए स्पर्धेत पाकिस्तानच्या म्हशीचा दूध देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 

सुखबीर यांच्या सरस्वतीचं वय 7 वर्षे आहे. या स्पर्धेत सरस्वतीने 32 लीटर 66 ग्रॅम दूध देऊन ही स्पर्धा आपल्या नावे करून घेतली आहे. सरस्वतीचं यानंतर खूप चर्चा होत असून सगळ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या अगोदरही सुखबीर स्पर्धेत उतरले होते. त्यावेळी त्यांच्या चार दातवाल्या म्हशीने पाकिस्तानचा रेकॉर्ड तोडला होता.