मुंबई : जुलै महिन्यापासून तुमच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. बँकांशी निगडीतसुद्धा काही गोष्टींची तुम्हाला माहिती घ्यावी लागणार आहे. जुलै महिन्यात किती बँक हॉलिडे असणार आहेत. याची तुम्हाला माहिती हवी. अन्यथा तुमच्या डेली वेळापत्रकानुसार तुम्ही बँकेची कामं शेड्युल केली तर, तुम्हाला बँक हॉलिडेचा सामना करावा लागू शकतो.
जुलै मध्ये १५ दिवस बँका बंद
जुलैच्या अर्ध्या महिन्यात बँका बंद असणार आहे. म्हणजेच 31 दिवसांपैकी 15 दिवस बँकांना सुटी असणार आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत जाणार आणि त्यावेळी बँक बंद असेल, असे व्हायला नको म्हणून बँकांच्या हॉलिडेची निट यादी करून ठेवा. RBI प्रत्येक राज्याच्या हिशोबाने बँकांना सुट्या जारी करीत असते. कारण प्रत्येक सण प्रत्येक राज्यात विशेषतः साजरा केला जात नाही.
या महिन्यात ९ सण येणार
या वर्षीच्या जुलै महिन्यात बँका ९ दिवस सणांमुळे बंद असणार आहे. बाकी ६ सुट्ट्या शनिवार आणि रविवारी असतील. याप्रमाणे बँका एकूण १५ दिवस कामकाज करू शकणार नाही. बँक हॉलिडेची संपूर्ण यादी पाहण्यासाठी RBIच्या अधिकृत संकेतस्थळाला https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx भेट देऊ शकता.