कोलकाता: दिल्लीमध्ये साडी नेसली म्हणून एक महिलेला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक घटना चर्चेत आहे. शॉर्ट कपडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
शॉर्ट कपडे घालून बँकेत गेलो तर तिथे सांगितलं पूर्ण कपडे घालून या हा दावा आहे कोलकाता इथल्या एका तरुणाचा. या तरुणाने शॉर्ट्स घातल्याने बँकेतून बाहेर काढल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी तरुणाने बँकेतील कर्मचाऱ्यांवर आरोपही केल्याचं सांगितलं जात आहे.
तरुणाने केलेल्या दाव्यानुसार तिथल्या कर्मचाऱ्याने या तरुणाला बाहेर जाण्यास सांगितलं. तुम्ही शॉर्ट्स घातले आहेत. आधी पूर्ण कपडे घालून या असं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. या तरुणाचं नाव आशीष असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना कोलकाता इथे घडल्याची माहिती मिळाली आहे.
या सगळ्या घटनेनंतर तिथे आशीषने एक प्रश्न विचारला. मात्र त्यावर कोणालाही उत्तर देता आलं नाही. बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी कोणता ड्रेसकोड आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर एक क्षण शांतता पसरली.
आशीषने त्यानंतर बँकेला ट्वीट करून निराशा व्यक्त केली. तुमची चिंता मी समजू शकतो. त्याचा मी सन्मानही करतो. पण बँकेत ग्राहकांसाठी ठरवून दिलेला ड्रेस कोड नाही. ते आपल्या आवडीनुसार कपडे घालू शकतात.
मी माझं 7 वर्ष जुनं अकाऊंड बंद करण्यासाठी तिथे गेलो होतो. मी माझं डेबिट कार्ड हरवल्याने हे खातं वापरणं बंद केलं होतं. हे खातं त्यामुळे मी बंद करायला तिथल्या ब्रँचमध्ये गेलो होतो. त्यावेळी हा प्रकार घडल्याचा त्याने दावा केला आहे.
अनेकांनी या ट्वीटनंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना नावं ठेवली. तर काही कर्मचाऱ्यांनी आशीषला एक प्रश्न विचारला. तुम्ही ऑफिस किंवा लग्नाला असे जाता का? नाही ना! मग बँकेत चांगले कपडे घालून का जाऊ शकत नाही? आता यावरून सोशल मीडियावर एक वेगळा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे.