'आधार' केंद्र उघडण्यासाठी बॅंकांना ३१ तारखेची डेटलाईन

केंद्र सरकारने बॅंकाना आधार कार्ड केंद्र सुरु करण्याचे आदेश दिलेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 30, 2018, 08:47 AM IST
'आधार' केंद्र उघडण्यासाठी बॅंकांना ३१ तारखेची डेटलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बॅंकाना आधार कार्ड केंद्र सुरु करण्याचे आदेश दिलेत. यासाठी ३१ मे ची अंतिम तारीख दिलेय. तसेच बॅंकानी दिवसाला किमान १६ आधार कार्ड काढली पाहिजेत, अशी सक्ती केली आहे. ही आधार कार्ड बॅंक खात्यांशी लिंक करण्यात येणार आहेत. तसेच या कामी बॅंकाना इन्सेंटिव्ह मिळणार आहे. दरम्यान, आतापर्यंत देशात १२१ कोटी आधार कार्ड तयार करण्यात आली आहेत.

१६ आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट

युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDI) सरकारी तसेच सर्व खासगी बॅंकेच्या संचालकांना पत्र पाठवून लवकरात लवकर आधार सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वाद आधी बॅंकेच्या १० शाखांपैकी कमीत कमी एक शाखेत आधार सेंटर सुरु करावयाचे आहे. या सेंटरमधून दररोज १६ आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेय.

युआयडीआयच्या नव्या आदेशामुळे बॅंकेवर याचा ताण येईल, असे बॅंक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काही शाखांमध्ये ४ ते ५ कर्मचारी असतात अशावेळी दोन कर्मचारी या कामात व्यस्त राहिले तर बॅंकांच्या कामावर परिणाम होईल, असे काही बॅंकांनी म्हटलेय.