गरम पाण्यासाठी गॅस गीझर वापरत असाल तर सावधान...

जर तुम्ही घरी गॅसच्या गीझरवर पाणी गरम करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 5, 2018, 10:21 PM IST
गरम पाण्यासाठी गॅस गीझर वापरत असाल तर सावधान... title=

नवी दिल्ली : जर तुम्ही घरी गॅसच्या गीझरवर पाणी गरम करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

गाझियाबादमध्ये राहणाऱ्या सिंघानिया दाम्पत्याचा गॅसच्या गीझरमुळे मृत्यू झाला आहे. अशी घटना पहिल्यांदा घडली असं नाही. याआधी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

गॅस गीझर कशा प्रकारे मृत्यूचं कारण बनतोय. याबाबत माहिती मिळवल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या. गॅस गीझर LPG च्या मदतीने पाणी गरम करतो. LPG हा ऑक्सीजनच्या संपर्कात आल्यानंतरच पटतो. 

एलपीजीमध्ये ब्यूटेन आणि प्रोपेन गॅस असतो. जो जळल्यानंतर कार्बन डायऑक्साइड तयार होतो. अशातच बाथरूम जर लहान असेल तर ऑक्सीजनचं प्रमाण तेथे कमी असतं आणि कार्बन डायऑक्साइडचं प्रमाणं वाढलं तर माणसाचं गुदमरुन जीव जाऊ शकतो.

एलपीजी गीझरमुळे तयार झालेल्या आगीमुळे ऑक्सीजनचं प्रमाण देखील कमी होतं. यानंतर कार्बन मोनॉक्साइड देखील बनतो. मेंदुत ऑक्सीजनच्या कमीमुळे देखील मृत्यू होऊ शकतो.