सोन्याच्या दरात घट तर, चांदी चमकली

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची आणि चांगली बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 5, 2018, 10:21 PM IST
सोन्याच्या दरात घट तर, चांदी चमकली title=
Representative Image

नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची आणि चांगली बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर धांतुंच्या किमतीत सुरु असलेल्या चढ-उतारामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

पाहा किती आहे प्रति तोळा दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३१,४५० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदी चमकली

सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना मात्र, चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ७० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,६०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ५०-५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३१,४५० रुपये आणि ३१,३०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.