close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा

भारत - पाकिस्तान दरम्यानच्या वाघा बॉर्डरवर शानदार सोहळा पार पडला.

Updated: Aug 15, 2017, 09:11 PM IST
वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा

अटारी : भारत - पाकिस्तान दरम्यानच्या वाघा बॉर्डरवर शानदार सोहळा पार पडला. हा सोहळा दररोज होत असला तरी स्वातंत्र्यदिन असल्यामुळे त्याचं महत्त्व वेगळं होतं. या सोहळ्या दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम् आणि हिंदूस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

दोन्ही देशांदरम्यान असलेलं पारंपारिक शत्रूत्व आणि असं असतानाही बंधुभाव आणि सहकार्य याचं प्रतिक असलेला हा देखणा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी दोन्ही देशांमधले शेकडो नागरिक वाघा बॉर्डरवर येतात. सूर्यास्तापूर्वी हा सोहळा सुरू होतो. सूर्यास्त होताच दोन्ही देशांचे राष्ट्रीय ध्वज एकाच वेळी खाली उतरण्यात येतात. १९५९ पासून वाघा बॉर्डरच्या बिटिंग रिट्रीट सोहळ्याची परंपरा सुरू आहे.

पाहा बिटिंग रिट्रीट सोहळा