कमी जोखमीत FD पेक्षा जास्त रिटर्न? हे Mutual Fund पाडतील पैशांचा पाऊस

Best Mutual Fund: अनेकवेळा आपण गुंतवणूक करताना खूप विचार करतो. कधी कधी गुंतवणूक करताना धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेतली जाते. मात्र, कमी जोखमीत एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर? काही म्युच्युअल फंड असे आहेत ते FD पेक्षा जास्त  रिटर्न देत आहेत. त्यामुळे यातून तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.

Updated: Nov 1, 2022, 11:45 AM IST
कमी जोखमीत FD पेक्षा जास्त रिटर्न?  हे Mutual Fund पाडतील पैशांचा पाऊस  title=

Bank FD: बँकेत एफडी करणे फायदेशीर असते. मात्र, यातून वार्षिक फक्त 5 टक्के परतावा मिळतो. त्याचवेळी, अशी अनेक माध्यमे आहेत, जिथे गुंतवणूक करुन, एखाद्या बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, ज्यामध्ये कमी जोखमीवर गुंतवणूक केल्यास एफडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.

लोकांना त्यांच्या कमाईतून बचत करण्याची इच्छा असते. तथापि, बरेचदा लोक त्यांच्या कमाईची गुंतवणूक कुठे करावी याबद्दल गोंधळात पडतात. (Investment Tips) अशा परिस्थितीत, लोक जोखीम न घेता एक चांगला पर्यात बघतात किंवा निवडतात. एकतर ते बँकांमध्ये बचत ठेवतात किंवा एफडी अथवा आरडी करतात. तथापि, जर तुमच्याकडे थोडीशी जोखीम घेण्याची क्षमता असेल, तर इतर कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक केल्यास एफडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. त्याचवेळी, म्युच्युअल फंड कमी जोखमीवर चांगला नफा मिळविण्याची संधी देखील देते.

बँकेत एफडी घेतल्यावर वार्षिक फक्त 5 टक्के परतावा मिळतो. मात्र जिथे गुंतवणूक करुन, एखाद्याला बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, ज्यामध्ये कमी जोखमीवर गुंतवणूक केल्यास एफडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. अधिक जाणून घ्या.

निप्पॉन इंडिया U/ST Duration Gr
Nippon India U या म्युच्युअल फंडाने FD पेक्षा जास्त परतावा दिला आहे आणि त्याचा परतावा तीन वर्षांत 5.78 टक्के आहे. हा अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन श्रेणीचा आहे आणि मध्यम जोखीम फंड आहे.

आदित्य बीएसएल बचत  
Aditya BSL Savings Gr या फंडाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. या फंडाचा तीन वर्षांचा परतावा 5.18 टक्के आहे. हा अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन श्रेणीचा आहे आणि मध्यम जोखीम फंड आहे.

UTI अल्ट्रा शॉर्ट टर्म Reg Gr
UTI Ultra Short Term Reg Gr या फंडाने गुंतवणूकदारांना एफडीच्या तुलनेत चांगले रिटर्न दिले आहेत.  या फंडाचा तीन वर्षांचा परतावा 5.15 टक्के आहे. हा अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन श्रेणीचा आहे आणि मध्यम जोखीम फंड आहे.

(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)