नवी दिल्ली : इंफोसिसने नफ्याच्या बाबतीत या महिन्यातही बाजी मारली आहे. २०१८ च्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इंफोसिसचा नफा ३७.६% वाढून ५१२९ कोटी रूपये झाला आहे. २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत हा नफा ३७२९ कोटी रूपये होता.
तिसऱ्या तिमाहीत इंफोसिस आय १.३% ने वाढून १७७९४ कोटी रूपये होता. दुसऱ्या तिमाहीत इंफोसिस आय १७,५६७ कोटी रुपये होती.
आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत इंफोसिसचा डॉलर आय १% ने वाढून २७५.५ कोटी डॉलर झाला आहे. तर दुसऱ्या तिमाहीत इंफोसिसचा डॉलर आय २७२.८ कोटी डॉलर होता.
सर्व तिमाहीच्या आधारावर तिसऱ्या तिमाहीत इंफोसिसचे एबिट ४२४६ कोटी रुपये होता. हा नफा २४.२% च्या तुलनेत २४.३% झाला.
तिमाहीच्या आधारावर तिसऱ्या तिमाहीत इंफोसिसचे स्टॅंड एलोन एट्रिशन दर १७.२% कमी होऊन १५.८% नफा झाला. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने एकूण १२,६२२ नव्या नियुक्ता केल्या.