Congress MP Demise: भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) काँग्रेस खासदार (Congress MP) संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhary) यांचे निधन झाले. संतोख सिंह हे काँग्रेसचे जालंधरचे खासदार आहेत. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते. आज सकाळी यात्रा लुधियाना इथे आली असता, चालतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. (National News in Marathi)
खासदार चौधरी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत चालत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. प्रवासादरम्यान संतोखसिंह चौधरी यांचा श्वास अचानक कोंडला आणि त्यानंतर ते रस्त्यावर खाली कोसळले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र संतोखसिंह चौधरी यांचे रुग्णालयात निधन झाले. काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा थांबवण्यात आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी भाषेत ट्विट केले की, जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनाने मला खूप दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
#WATCH | Ludhiana, Punjab: Congress MP Santokh Singh Chaudhary was rushed to a hospital in an ambulance after he collapsed while walking during Bharat Jodo Yatra today. He passed away soon after.
(Earlier visuals) pic.twitter.com/DO1WU2lTtC
— ANI (@ANI) January 14, 2023
काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. फिल्लौरजवळ भारत जोडो यात्रेदरम्यान ते अचानक रस्त्यावर कोसळले आणि त्यानंतर त्याला फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी संतोखसिंह चौधरी यांना मृत घोषित केले. संतोख सिंह चौधरी यांचे पुत्र विक्रमजीत सिंह चौधरी हे फिल्लौरचे आमदार आहेत.
काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी सांगितले की, पक्षाचे खासदार संतोख चौधरी यांचे निधन झाले आहे. चौधरी फिल्लौरमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत सहभागी झाले असताना त्यांची तब्बेत बिघडली. बाजवा स्वतः आज भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, चौधरी यांना फगवाडा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला.