Rahul Gandhi security lapses : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. होशियारपूरमध्ये राहुल यांच्या सुरक्षेत त्रुटी दिसून आली आहे. (Rahul Gandhi security ) होशियारपूर येथे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु होती. (Bharat Jodo Yatra in Punjab) या यात्रेदरम्यान सुरक्षेत काही चुका झाल्या आहेत. अचानक एका व्यक्तीने राहुलला मिठी मारली. तर भेटीदरम्यान राहुल यांच्या गळ्याभोवती दोन्ही हात टाकून त्यांना गच्च मिठी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहींना त्या तरुणाला दूर केले.
पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत दोनदा त्रुटी झाली होती. होशियारपूरमध्ये आधी एक तरुण धावत आला आणि त्याने राहुल यांना जबरदस्तीने मिठी मारली. यानंतर एक संशयितही राहुल यांच्या अगदी जवळ पोहोचला होता. तरुणाने राहुलला मिठी मारली तेव्हा राहुल गांधी यांनी पंजाब काँग्रेसचे प्रमुख राजा वार्डिंग यांच्या मदतीने त्याला दूर ढकलले. यानंतर बस्सी गावात टी-ब्रेकमध्ये जात असताना डोक्याला भगवा कपडा बांधून एक तरुण राहुलच्या जवळ आला. हे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. या दोन्ही घटना 35 मिनिटांत घडल्या.
राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये जास्तीत जास्त सुरक्षा देण्यात आली असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये जास्तीत जास्त सुरक्षा देण्यात आली असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राहुल यांना सुरक्षेचे कड आहे. यात पंजाब पोलिसांची गराडा, त्यानंतर राज्य सीआयडीची गराडा आणि शेवटी राहुल यांची सुरक्षा आहे. अशी त्यांना थ्री लेयर सिक्युरिटी असताना तरुणांना त्यांना जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला.
#WATCH | Punjab: A man tried to hug Congress MP Rahul Gandhi, during Bharat Jodo Yatra in Hoshiarpur, was later pulled away by workers.
(Source: Congress social media) pic.twitter.com/aybyojZ1ps
— ANI (@ANI) January 17, 2023
राहुलच्या दौऱ्याच्या पहिल्या 15 दिवसांत अशी कोणतीच चूक झाली नाही. काल संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना अरविंद केजरीवाल यांच्या दबावाखाली येऊ नका असे सांगितले होते.
राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. काश्मीरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी (Bharat Jodo Yatra in Kashmir) यांना काही ठिकाणी न फिरण्याचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील काही ठिकाणी फिरणे टाळावे, अशी माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली. त्यांनी चालण्याऐवजी गाडीतून प्रवास करावा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा 19 जानेवारीला जम्मू-काश्मीरमधील लखनपूर येथे दाखल होणार आहे.