मुंबई : डिजीटल व्यवहार करण्यासाठी सरकारने सुरु केलेले भीम अॅप तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भीम अॅप वापरणा-यांना आजपासून कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करण्यात आलेल्या या अॅपच्या माध्यमातून कॅशबॅक योजनांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. या कॅशबॅकच्या ऑफरमधून ग्राहकांना महिन्याला साडेसातशे रुपये आणि व्यावसायिकांना हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकणार आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्ताने बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना भीम अॅप समर्पित करण्यात आलेय. आंबेडकर जयंतीनिमित्ताने ही कॅशबॅक ऑफर लागू करण्यात आली आहे. भीम अॅप आर्थिक व्यवहारांसाठी आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेय. आर्थिक व्यवहारांसाठी इंडियन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन, भारत सरकारद्वारे सुरू केलेला एक उपक्रम आहे. भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहक महिनाभरात ७५० रुपये कॅशबॅक मिळवू शकतात आणि व्यापारी एक महिन्यासाठी १,००० रुपये कॅशबॅक मिळवू शकतात.
भारत इंटरफेस फॉर मनी अर्थात भीम अॅपला नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. हे अॅप केवळ २ एमबी आहे. त्यामुळे काही सेकंदात अॅप डाऊनलोड होते. हे अॅप वापरणाऱ्यांसाठी बॅंक खाते आपल्या मोबाईल नंबरने जोडलेले हवे.
हे अॅप प्रथमच डाऊनलोड केल्यानंतर ते अॅक्टीव्ह करा. आपल्या डेबिट कार्डची आवश्यकता आहे. आपण अॅप डाउनलोड करताच आपल्याला 4 अंकी डिजिटल पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर, डेबिट कार्डावर देण्यात आलेल्या माहितीमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. भीम अॅपचा वापर सर्व भारतीय भाषांव्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये होऊ शकतो.