नवी दिल्ली : भीमा कोरेगाव प्रकरणात फरीदाबादहून अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांच्या ट्रान्झिट रिमांडवर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानं तीन दिवसांचा स्टे लावलाय. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार, भारद्वाज यांना ३०-३१ ऑगस्टपर्यंत पोलिसांच्या देखरेखीखाली त्यांच्या घरातच राहण्याचे आदेश देण्यात आलेत. न्यायिक दंडाधिकारी अशोक शर्मा यांनी सुधा भारद्वाज यांना ३०-३१ ऑगस्टपर्यंत सुरजकुंड पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत.
यापूर्वी भारद्वाज यांच्याकडून करण्यात आलेली ट्रान्झिट जामीन अर्ज फरीदाबाद मॅजिस्ट्रेट कोर्टानं फेटाळून लावला होता. यानंतर हायकोर्टाकडून त्यांना दिलासा मिळालाय. सुधा भारद्वाज यांना मीडियाशी बोलण्यास बंधी घालण्यात आलीय... परंतु, आपल्या वकिलांशी मात्र त्या संवाद साधू शकतील.
मंगळवारी मुंबईतून व्हर्नन गोन्साल्वीस, ठाण्यातून अरुण परेरा, हैदराबादेतून वरावरा राव, दिल्लीतून गौतम नवलखा आणि फरिदाबादेतून सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आलीय.