कधी एका कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडलिंग करायचे भय्यूजी महाराज

भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ

Updated: Jun 12, 2018, 03:32 PM IST
कधी एका कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडलिंग करायचे भय्यूजी महाराज title=

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांचं निधन झालं आहे. त्यांनी स्वत: वर गोळ्या घालून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अजून समोर आलेलं नाही. मध्य प्रदेशातात भय्यू जी महाराज यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देखील देण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. 

1968 मध्ये भय्यूजी महाराज यांचा जन्म झाला होता. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदय सिंह देखमुख आहे. त्यांनी कपड्याच्या एका ब्रँजसाठी मॉडलिंग देखील केलं होतं. भय्यू महाराज यांचा देशातील अनेक मोठ्या नेत्यांशी चांगले संबंध होते. शुजालपूरच्या जमीनदार घराण्यातून ते होते.

भय्यू जी तेव्हा चर्चेत आले जेव्हा 2011 मध्ये अन्ना हजारे यांचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांना तत्कालीन केंद्र सरकारने आपला दूत म्हणून पाठवलं होतं. यानंतर अन्ना हजारे यांनी त्यांच्या हातून ज्यूस पिवून उपोषण सोडलं होतं.

पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी जेव्हा सद्भावना उपोषणावर बसले होते तेव्हा देखील भय्यू महाराज यांना त्यांचा उपवास सोडवण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं.

भय्यूजी महाराज यांचा सदगुरु दत्त धामिर्क ट्रस्ट नावाचा ट्रस्ट आहे. ट्रस्टच्या माध्यमातून ते स्कॉलरशिप द्यायचे. कैद्यांच्या मुलांना ते शिकवायचे. शेतकऱ्यांना ते मोफत खाद्य आणि बियानं पुरवायचे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात त्यांने मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत.