कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक, शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी होणार मोठी घोषणा

Updated: Jun 5, 2018, 08:29 PM IST
कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक, शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा title=

नवी दिल्ली : बुधवारी केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करु शकते. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार उद्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता देण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करु शकते. तर खरीप पिकांचं मूल्य 1.5 टक्क्यांनी वाढवू शकते.

बैठकीत घेतले जाणार महत्त्वाचे निर्णय

- खरीप पिकांचं मूल्य 1.5 टक्के वाढवलं जाऊ शकतं. 

- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून 10000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं जाऊ शकतं. 

- 30 लाख टन साखरचा स्टॉक बनवण्याच्या योजनेला मंजुरी दिली जाऊ शकते. बफर स्टॉक बनवण्यासाठी 1200 कोटी रुपये लागण्याची शक्यता 

- देशात इथेनॉलची क्षमता वाढवण्यासाठी विशेष पॅकेज दिलं जाण्याची शक्यताय. 4400 कोटींच्या या पॅकेजमध्ये इथेनॉलच्या उत्पादनासाठी ऊसाचा वापर वाढवण्यासाठी जोर देण्यात येईल.

- सरकारी कारखान्यातून निघणारी साखरचं कमीत कमी मुल्य 30 रूपये प्रति किलो करण्याची शक्यता आहे. म्हणजे कारखाने कमीत कमी 30 रुपयांमध्ये साखर विकू शकता.

- साखर कारखान्यावर साखर किती ठेवावी याबाबत देखील एक मर्यादा निश्चित केली जाण्य़ाची शक्यता आहे.

- सरकार हे देखील निश्चित करु शकते की, कोणताही साखर कारखाना एका महिन्याला किती साखर उत्पादन करणार