Breaking News : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना; एअरपोर्ट एकच खळबळ

दिल्लीच्या IGI एयरपोर्ट वरून पुण्याला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळालीये.

Updated: Jan 12, 2023, 08:27 PM IST
Breaking News : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना; एअरपोर्ट एकच खळबळ  title=

Bomb scare on Delhi airport: दिल्लीच्या IGI एयरपोर्ट वरून पुण्याला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. दरम्यान ही माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी सतर्कता दाखवत अलर्ट जाहीर केला आहे. एअरपोर्टवरून हे विमान संध्याकाळी 6.30 वाजता उडणार होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान गुरुवारी संध्याकाळी म्हणजेच आज 6.30 वाजता उड्डाण भरणार होतं. त्याचवेळी विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाली. यानंतर विमान सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. शिवाय बॉम्बचा शोध घेण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान यामुळे विमानतळावर गोंधळ उडाला होता.